राजगुरूनगरमध्ये दोन चिमुरड्यांची हत्या; एकीवर अत्याचार 54 वर्षीय नराधमाला अटक

राजगुरूनगरमध्ये दोन चिमुरड्यांची हत्या; एकीवर अत्याचार 54 वर्षीय नराधमाला अटक

राजगुरू नगर (खेड)मधून गायब झालेल्या दोन्ही चिमुकल्या बहिणींची हत्या झाल्याचे उघडकीस आले असून शेजारी राहणाऱ्या एका आचाऱ्यानेच हे कृत्य केले आहे. नराधम आरोपीला ग्रामीण पोलिसांनी बेड्य़ा ठोकल्या आहेत. यातील एका मुलीवर या नराधमाने अत्याचार केला. राजगुरू नगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला एका ड्रममध्ये दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आरोपीला फाशी झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत मुलीच्या पालकांसह नागरिकांनी खेड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले.

अजय दास (54) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. मुलींचा खून करून परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी दास याला येथील एका लॉजमधून बेडय़ा ठोकल्या. त्याच्यावर राजगुरू नगर पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’सह खुनाच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी राजगुरू नगरमधून दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार खेड पोलिसांकडे आली होती. घराबाहेर खेळत असलेल्या आठ आणि नऊ वर्षांच्या दोन बहिणी गायब झाल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. रात्री उशिरा शहरालगत असलेल्या एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. छिन्नविछिन्न अवस्थेत एका ड्रममध्ये मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱया आरोपी दास या नराधमानेच हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. आरोपीने मुलींना पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले.

आरोपी आचारी म्हणून काम करतो. बुधवारी त्याने घराबाहेर खेळणाऱ्या मुलींना बोलावून घेतले. एकीवर अत्याचार केला. त्या वेळी तिने विरोध केला, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आपले बिंग फुटेल, या भीतीने त्याने तिचा जीव घेतला. त्यानंतर घाबरलेल्या आचाऱ्याने दुसऱ्या बहिणीचा तसाच जीव घेतला. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावली. दरम्यान, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर इतर बाबी समोर येतील. पीडित मुलींचे वडील सफाई कर्मचारी, तर आई मोलमजुरीचे काम करते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यावरून आता राजकारण...
राजघाटाऐवजी निघमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार, काँग्रेसचा आक्षेप
ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, तारीखही ठरली
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज! 2184 पोलीस अधिकारी आणि हजारोंचा फौजफाटा तैनात
देशाच्या प्रगतीत आणि विकासात डॉ. मनमोहन सिंग यांचे अतुलनीय योगदान, सोनिया गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली
घाटकोपरमध्ये भीषण अपघात, टेम्पोने 5 जणांना चिरडले; एका महिलेचा मृत्यू
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर चीन, रशिया आणि अमेरिकेसह अनेक देशांनी व्यक्त केला शोक