बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मेंढपाळांनी तयार केले भन्नाट जुगाड

बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मेंढपाळांनी तयार केले भन्नाट जुगाड

उत्तर पुणे जिल्ह्यात बहुतांश सर्वच भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून विशेषता जुन्नर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या खेड आंबेगाव जुन्नर व शिरूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची दहशत आहे. बिबट्याने सर्वात जास्त हे पाळीव प्राण्यावर हल्ले केल्याच्या घटना घडत असून या घटनांमधून फिरत असणारे मेंढपाळ देखील सुटलेले नाहीत. आंबेगाव तालुक्यात आत्तापर्यंत अनेक मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र बिबट्याने आपल्या कुटुंबावर हल्ला करू नये यासाठी मेंढपाळांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने जुगाड तयार केले असून यामुळे मेंढपाळ वर्ग आपला स्वतःचा जीव नक्कीच वाचवू शकतील अशी आशा मेंढपाळांना झाली आहे.

जुन्नर वनपरिक्षेत्रात राज्यात सर्वात जास्त बिबटे असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर जुन्नर वनपरिक्षेत्रातील जुन्नर तालुका व शिरूर तालुका या तालुक्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले झालेले आहेत. हे हल्ले होत असताना सर्वात जास्त हल्ले हे या शेतातून त्या शेतात, या गावातून त्या गावात फिरणाऱ्या मेंढपाळ यांच्या शेळ्या मेंढ्या तसेच घोड्यांवर हल्ले होत आहेत, हे हल्ले होत असताना स्थानिक शेतकऱ्यांच्या देखील गाई, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे या पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला होत असल्याच्या घटना दररोज कुठे ना कुठे ऐकायला मिळत असतात. पारनेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ हे आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात आपल्या शेळ्या मेंढ्यांचा कळप घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात येत असतात. ते शेतात कळप बसवून शेतात मोठ्या प्रमाणावर खत निर्माण होत असते त्यामुळे शेतकरी देखील या मेंढपाळांना बोलावून घेतात. त्याच्या बदल्यात त्यांना रोख रक्कम व अन्नधान्य मिळत असते. हे असेच फिरताना वाढत्या बिबट्याच्या संख्येमुळे मेंढपाळ वर्ग दररोज होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे बेजार असताना  त्याला स्वतःची व कुटुंबाची देखील जीवाची भीती वाटू लागली आहे. ज्या मेंढपाळांची आर्थिक क्षमता बऱ्यापैकी चांगली आहे त्यांनी स्वतःचा बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी जुगाड निर्माण केले आहे. यामध्ये त्यांनी ट्रॅक्टर खरेदी करून ट्रॅक्टरला मागे असणाऱ्या ट्रॉलीवरच आता आपला संसार थाटला आहे. यात ट्रॉलीमध्ये दोन कप्प्याची रचना त्यांनी केली असून ट्रॉलीच्या मध्ये फळ्या टाकून खालील बाजूस आपल्या शेळ्या मेंढ्यांची लहान लहान कोकरे, कोंबड्या यांना ठेवले जातात तर वरील बाजूस स्वतःचे कुटुंबाचे सामान कुटुंब व लहान मुले यांना ठेवून बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचे नवीनच जुगाड तयार केलेले पाहायला मिळत आहे. मूळचे ढवळपुरी ता. पारनेर येथील असणारे चिमा बरकडे सध्या रा. जवळे यांनी या प्रकारचे जुगाड बिबट्यापासून स्वतःच्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी तयार केलेले आहे. नुकतेच जुन्नर वनविभागात देशात पहिल्यांदाच मेंढपाळांना बिबट्या पासून संरक्षण करण्यासाठी घडी घालणारा तंबू व सोलर लाईट दिली असली तरी मेंढपाळांनी स्वतःहून कुटुंबाच्या संरक्षणासाठी केलेली हे जुगाड इतर मेंढपाळांना नक्कीच फायद्याचे ठरेल असे मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी सांगितले.

मेंढपाळांनी केलेले हे जुगाड नक्कीच त्यांच्यासाठी 100% फायद्याचे ठरेल. ज्या मेंढपाळांना शक्य असेल अशा सर्व मेंढपाळांनी हा प्रयोग केला तर नक्कीच त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल असे जुन्नर वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोंडी केली, खटले दाखल केले, पक्ष सोडण्यासाठी दबाव… धंगेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून राऊतांचा आरोप कोंडी केली, खटले दाखल केले, पक्ष सोडण्यासाठी दबाव… धंगेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून राऊतांचा आरोप
रविंद्र धंगेकर हे सुरूवातील शिवसेनेमध्ये होते, नंतर ते मनसेत गेले, पुढे काँग्रेसमध्ये गेले आणि काल त्यांनी एकनाथ शिंदे गटात (...
‘तारक मेहता..’ फेम बबिताजी वयाच्या 37 व्या वर्षी सिंगल का? कारण वाचून व्हाल थक्क!
‘छावा’ने कमालच केली..; महिना होत आला तरी थिएटरमध्ये विकी कौशलचाच दबदबा
‘उदित की पप्पी…’, Kiss विवादावर उदित नारायण यांनी सोडलं मौन; म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी…’
रवीना टंडनच्या लेकीचं दुसऱ्या धर्मात लग्न; भडकले नेटकरी
मजुरांची टंचाई; शेतकरी मेटाकुटीला, बटाटा काढणीसाठी मजूर मिळेना
Pune crime news – शिरूरमधील कॅफेमध्ये तरुणाईची डिंगडांग