झाकीर हुसेन यांची प्रकृती चिंताजनक
जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक वृत्ते येत होती. त्याचे कुटुंबीयांकडून खंडन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसेन अमेरिकेत वास्तव्याला आहेत. अलीकडेच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती. दरम्यान, आज प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयविकाराचा त्रास असून त्यांची प्रकृती गंभीर आहे, असे सांगण्यात आले.
निधनाचे वृत्त चुकीचे, बहिणीने केले स्पष्ट
झाकीर हुसेन यांच्या प्रकृतीबाबत माध्यमांत उलटसुलट बातम्या प्रसारित झाल्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही एक्स माध्यमावर पोस्ट केली. मात्र, या पोस्ट रात्री उशिरा मागे घेण्यात आल्या. झाकीर हुसेन यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना प्रकृतीस्वास्थ्य लाभावे यासाठी प्रार्थना करा, अशी पोस्ट त्यांचा भाचा अमीर औलिया याने केली. बहीण खुर्शीद औलिया यांनीही झाकीर यांच्या निधनाच्या बातम्या चुकीच्या असल्याचे नमूद केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List