राज्यातील थंडी वाढली; आगामी दोन दिवस काही जिल्ह्यांना शीतलहरीचा इशारा
राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखोरीपासून थंडीला सुरुवात झाली होती. मात्र, मध्यंतरी आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात बदल झाला होता. आता पुन्हा राज्यात तापामानात घसरण होत असून राज्यात पुन्हा थंडीला सुरुवात झाली आहे. तसेच आगामी दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना शीतलहरीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आगामी काही दिवस तापामानात घट होणार असून राज्यातील थंडी वाढण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरातही गारवा वाढवा आहे. त्यामुळे मुंबई उनगर, ठाणे परिसरातही थंडी वाढली आहे. तसेच कोकणातही तापमानात घट होत आहे. हे वातावरण आंब्याच्या मोहरासाठी पोषक आहे. उत्तेरकडील थंड वाऱ्यांचा जोर वाढला आहे. ते वारे राज्यात येत असल्याने राज्यातीव तापमानात घट होत आहे.
उत्तर महाराष्ट्रात तापमानात प्रचंड घट झाली आहे. धुळ्यात 4.1 अंश सेल्सियस अशा नीच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात आणखी दोन दिवस थंडीचा लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा जोर वाढला. पुणे शहरात शनिवारी 10.1 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील किमान तापमान घसरले आहे. महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. आगामी काही दिवसात राज्यात हुडहुडी भरवणाकी थंडी पडणार असल्याचे हवामान विभागने म्हटले आहे.
थंडीच्या कडाक्यामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा पारा घसरला आहे. निफाड तालुक्यातील ओझर येथे राज्यात किमान तापमानाची निच्चाकी नोंद झाली आहे. ओझरमध्ये 3.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची भीती आहे.
उत्तरेतील अतिशीत वारे छत्रपती संभाजीनगरकडे वाहून येत आहेत. त्यामुळे राज्यात जळगाव शहरात 8.4, अहिल्यानगरमध्ये 8.7 आणि नागपूरमध्ये 9.4 अंश तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बुलडाणा, अकोला शहरांत तापमान 10.6 अंश होते. डिसेंबरमध्ये शहरात किमान तापमान प्रथमच 10.6 अंश नीचांकी पातळीवर गेले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List