ऐश्वर्याने अभिषेक सोबत लग्न केल्यामुळे…, सलमान खान याचं मोठं वक्तव्य
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण अभिषेक याच्यासोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्या अभिनेता सलमान खान याला डेट करत होती. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं होतं. एवढंच नाही तर, चाहते सलमान – ऐश्वर्या यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत देखील होते. पण सलमान – ऐश्वर्या यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं आहे.
सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री अभिषेक याच्यासोबत संसार थाटला. पण आज वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान खान अविवाहित आहे. पण एका मुलाखतीत सलमान खान याला ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं.
एका मुलाखतीत सलमान खान, ऐश्वर्या बद्दल म्हणाला होता, ‘त्या गोष्टीला अनेक वर्ष झाली आहे. आत ती कोणाची तरी पत्नी आहे. ऐश्वर्याने अभिषेक याच्यासोबत लग्न केल्यामुळे मी आनंदी आहे. अभिषेक एका चांगला मुलगा आहे. एक्स-बॉयफ्रेंडला आणखी काय हवं आहे…’
‘नातं संपल्यानंतर एक्स-गर्लफ्रेंडला वाईट परिस्थितीत पाहण्याची कोणत्याच एक्स बॉयफ्रेंडची इच्छा नसते… माझ्या मनात आता कोणतीच पश्चातापाची भावना नाही. ऐश्वर्याने कायम आनंदी राहवं अशीच माझी इच्छा आहे.’ असं देखील सलमान खान म्हणाला होता.
सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमातून दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. रिलेशनशिपमध्ये असताना दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण सलमान – ऐश्वर्या यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्याने सलमान याच्यावर मानसीक आणि शारीरिक छळाचे आरोप केले होते.
ऐश्वर्या – अभिषेक यांचं नातं
गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान अभिषेक याच्या नावाची चर्चा अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत देखील होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List