‘बेटेंगे तो कटेंगे’वर संजय राऊतांचा निशाणा; म्हणाले जनतेचा ‘मिजाज’…

‘बेटेंगे तो कटेंगे’वर संजय राऊतांचा निशाणा; म्हणाले जनतेचा ‘मिजाज’…

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले होते. यावेळी त्यांनी ‘बेटेंगे तो कटेंगे’ असं जाहीर सभेत विधान केलं. त्यांच्या विधानावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. तर महाविकास आघाडीने मात्र यावर तीव्र आक्षेप घेतला. आजच्या सामनाच्या अग्रलेखातही यावर भाष्य करण्यात आलं आहे. ‘बटेंगे-कटेंगेचा तडका; अंग अंग भडका!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

‘बटेंगे-कटेंगेचा तडका, अंग अंग भडका’ अशी महायुतीतील आणि भाजपमधील काही मंडळींची अवस्था झाली आहे. तीच अस्वस्थता या घोषणांना होणाऱ्या त्यांच्या जाहीर विरोधातून दिसून येत आहे. भाजपने हा तडका देऊन महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम भडका उडविण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यावरून महायुती आणि खुद्द भाजपमध्येच भडका उडाला आहे. भाजपवाल्यांनी खुशाल त्यांच्या’घोषणांच्या नंदनवना’त राहावे, पण तुमचा हा तडका आणि भडका महाराष्ट्रात चालू देणार नाही, असाच निर्धार येथील जनतेने केला आहे. मि. फडणवीस, राज्यातील जनतेचा ‘मिजाज’ हाच आहे!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. आतापर्यंतच्या प्रचारात भाजपसह सत्ताधारी महायुतीला महाराष्ट्रातील जनता ‘एक दिलाने’ घरी बसवणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचाराचा फोकस नेहमीप्रमाणे जातीय-धार्मिक मुद्द्यांवर नेण्यास भाजपवाल्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या आवडत्या हिंदू-मुस्लिम मुद्द्याला ही मंडळी उठता-बसता ‘फोडणी’ घालत आहे. त्यावर ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ वगैरे विषारी घोषणांचा तडका देत वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा तवा तापवून त्यावर मतांची पोळी भाजून घ्यायची, हाच भाजपचा या घोषणांमागील सुप्त हेतू आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटेंगे तो कटेंगे’ ही आणि पंतप्रधान मोदी वाजवीत असलेली ‘एक हैं तो सेफ है’ ही पिपाणी सर्वत्र वाजवली जात आहे. सोशल मीडियावरही भाजप आणि परिवारातील सायबर धाडी या घोषणांना पूरक पोस्ट्स व्हायरल करून भाजपचा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवीत आहेत. हे सगळे जोरात सुरू असले तरी ‘बटेंगे तो कटेंगे’च्या फोडणीचा ठसका भाजपच्या मित्रपक्षांनाच नाही, तर स्वपक्षातील काही मंडळींनाही लागला आहे. अजित पवार यांनी तर या घोषणेला थेटच विरोध दाखवला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध, पण आम्ही महाराष्ट्र…; संजय राऊतांचा हल्लाबोल फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध, पण आम्ही महाराष्ट्र…; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध आहे. पण महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं धर्मयुद्ध सुरु आहे, असं...
Amit Thackrey : पुढच्या वेळी घरी येताना… अमित ठाकरे यांना चिमुकलीचे पत्र, अशी मागणी केली की..
‘बेटेंगे तो कटेंगे’वर संजय राऊतांचा निशाणा; म्हणाले जनतेचा ‘मिजाज’…
कैद्याकडून येणाऱ्या गिफ्टबद्दल जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरण, ‘महागडे गिफ्ट मिळत असल्यामुळे…’
कदाचित उद्या माझा अखेरचा दिवस… आमिर खानच्या वक्तव्यानंतर चाहते चिंतेत
कीर्तनात व्यत्यय आणल्याने शीख बांधव संतापले.. चलो चलो बाहर निकलो; ठाण्याच्या गुरुद्वारातून नड्डांना बाहेर काढले
धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये रुग्णालात आग, 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू