कपिल शर्माच्या शोला कॉमेडी नडली, थेट कायदेशीर नोटीस; सलमान खानच्या टीमने केले हात वर म्हाणाले,” आमचा काय संबंध….”

कपिल शर्माच्या शोला कॉमेडी नडली, थेट कायदेशीर नोटीस; सलमान खानच्या टीमने केले हात वर म्हाणाले,” आमचा काय संबंध….”

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या शोमध्ये कोणत्यातरी विनोदावरून कोणाची तरी नाराजी किंवा ट्रोल झालेल्या घटना बऱ्याचदा घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा या शोमध्ये केलेल्या कॉमेडीमुळे शोमधील कलाकारांसह प्रॉडक्शन हाऊसही अडचणीत आले आहे.

सलमान खानच्या टीमचे हात वर 

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोला कायदेशीर नोटीस मिळाली आहे. ही कायदेशीर नोटीस 1 नोव्हेंबरला पाठवण्यात आली आहे. बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि महान कवी रवींद्रनाथ टागोर यांची खिल्ली उडवल्याचा आरोप या कार्यक्रमावर करण्यात आला आहे.

Kapil Sharma Show controversy

दरम्यान सलमानही या शोच्या निर्मात्यांपैकी एक असल्याचा समज असल्याने सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसलाही या वादात कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, सलमानच्या टीमने आपला या शोशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

रिपोर्टनुसार, सलमान खानच्या टीमने स्पष्ट केले आहे की सलमान खान किंवा SKTV ला देखील नोटीस मिळाली आहे, जे चुकीचे आहे. कारण आम्ही नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शोशी जोडलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

गेल्या आठवड्यात, दो पत्ती चित्रपटाची स्टारकास्ट काजोल आणि क्रिती सेनन शोमध्ये हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये कृष्णा अभिषेकने जॅकी श्रॉफची नक्कल करत एक अभिनय केला. जिथे त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचे प्रसिद्ध गाणे ‘एकला चलो रे’ बदलले. म्हणजे कृष्णाने ‘एकला’ या शब्दाच्या जागी ‘पाचला’ शब्द टाकला, ज्याचा अर्थ ‘पाच लोकांसोबत चालणे’ असा होतो.

Kapil Sharma Show controversy

पुढे तो गंमतीने म्हणाला की एकट्याने चालल्याने कुत्रे त्याच्या मागे लागतात. या एपिसोडवर प्रेक्षक खूप हसले असले तरी बंगाली समुदायाला ते अजिबात आवडलं नाही. बंगाली कवी सृजतो बंद्योपाध्याय यांनी फेसबुकवर याचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी लिहिले की, “विनोद करणे आणि मजा करणे यात फरक आहे आणि ती पातळी ओलांडणे धोक्याचे असू शकते”

तसेच ते पुढे म्हणाले,” आपण कोणाची चेष्टा करतोय, काय बोलतोय आणि कुठल्या टोकाला जातोय याकडे अनेकदा लोक लक्ष देत नाहीत. हे सर्व उच्च रेटिंग मिळवण्याच्या आणि लोकांना हसवण्याच्या इच्छेने घडते. रेषा कुठे काढायची ते विसरतात”.

दरम्यान संगीत दिग्दर्शक इंद्रदीप दासगुप्ता, गायिका इमान चक्रवर्ती आणि चित्रपट निर्मात्या सुमन मुखोपाध्याय यांनीही या भागाचा निषेध केला आहे. बोंगो भाषा महासभा फाउंडेशनने आपल्या कायदेशीर नोटीसमध्ये दावा केला आहे की, रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘एकला चलो रे’ हे गाणे बंगाली घराघरात आदरणीय गाणे आहे.

त्यामुळे या गाण्याची खिल्ली उडवून सांस्कृतिक आणि धार्मिक सीमा ओलांडल्या असल्याचे नोटीसमध्ये म्हटलं आहे. या शोचे निर्माते आणि कपिल शर्मा यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीड हजार दिलेत… 3 हजार वसूल करणार! भाजपाच्या महिला उपाध्यक्षाची लाडक्या बहिणींना दमबाजी दीड हजार दिलेत… 3 हजार वसूल करणार! भाजपाच्या महिला उपाध्यक्षाची लाडक्या बहिणींना दमबाजी
1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 रुपये वसूल करणार, अशी दमबाजी कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी...
पुण्यात पोलिसांनी जप्त केलेले 5 कोटी गेले कोठे? युवक काँग्रेसचा सवाल
मोदीजी, महाराष्ट्रात तुमची नाही, फक्त ठाकरेंची गॅरंटी चालते! उद्धव ठाकरे यांच्या दणदणीत सभा, भाजपवर जोरदार हल्ला
वांद्रे पूर्व – पुनर्विकासाचा प्रश्न निर्णायक ठरणार
महाराष्ट्राला गुजराष्ट्र, अदानीराष्ट्र करण्याचा भाजपचा डाव; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
जीवनदायी सेवाकार्याला एक तप पूर्ण, बाळासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान उपक्रम
महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर मोदी युगाचा अस्त होईल, शरद पवार यांचे भाकीत