जया बच्चन रेखा यांना असं काय म्हणाल्या होत्या की, त्या अमिताभ यांच्या जीवनातून निघून गेल्या
अमिताभ आणि रेखा यांचं नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन मोठी नाव आहेत. या दोन स्टार्सची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. रेखा आणि अमिताभ यांच्या चर्चा ही बॉलीवूडमध्ये नेहमीच असते. पण रेखा आणि अमिताभ यांच्याबद्दल बोलणारे हे विसरतात की त्यांच्यामध्ये तिसरी व्यक्ती आहे आणि ती म्हणजे जया बच्चन. ज्या वेळी रेखा आणि अमिताभ यांचे प्रेम फुलत होते, त्या वेळी जयाच्या कानावरही ही बातमी पोहोचली होती. जया यांनी ही परिस्थिती कशी हाताळली हे फार कमी लोकांना माहीत आहे.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील प्रेमप्रकरण 1976 मध्ये ‘दो अंजाने’ चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाले होते. पण शूटिंगदरम्यान रेखासोबत गैरवर्तन केल्याबद्दल अमिताभ यांनी सहकलाकाराला मारहाण केल्याने ही गोष्ट सगळ्यांना कळाली. नंतर ही गोष्ट जयापर्यंत पोहोचली. ‘सिलसिला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि अमिताभ या दोघांनीही फक्त अभिनयच केला नसून प्रत्यक्षात एकमेकांवर प्रेम केल्याचेही बोलले जाते.
जेव्हा ही प्रेमाची बातमी जया यांच्या कानावर पोहोचली तेव्हा जया यांनी काय केले हे ज्यांना माहित आहे ते आजही जया बच्चन यांच्या धाडसाचे कौतुक करतात. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या बातम्या येताच जया यांनी रेखाला आपल्या घरी जेवायला बोलावलं. रेखालाही माहित होतं की जयाला तिच्या आणि अमिताभबद्दल सगळं माहीत आहे, त्यामुळे तिच्या घरी जेवायला जाणं थोडं विचित्र होतं. रेखाला वाटले की जया घरी आल्यावर खूप रागावेल किंवा काहीतरी चुकीचे बोलेल. पण जयाने तसे काही केले नाही.
रेखा अमिताभ यांच्या घरी गेल्यावर जया यांनी त्यांचे स्वागत केले.जया रेखाला खूप प्रेमाने भेटली आणि तिला जेवण खाऊ घातले. पण तिला भेटण्यापूर्वी जया रेखाला असे काही बोलली की ती अमिताभच्या घरी परत आली नाही ना त्यांच्या आयुष्यातून ही निघून गेली. जया रेखाला म्हणाली की, मी अमितला कधीही सोडणार नाही.
जया यांच्या या विधानामुळे रेखाला समजले की अमिताभ आणि त्यांचे नातं जरी जुळलं असलं तरी ते कधीही एकत्र होऊ शकत नाहीत. खऱ्या आयुष्यात त्यानंतर रेखाने पुन्हा कधीच अमिताभ यांच्या घरात पाऊल ठेवले नाही किंवा अमिताभसोबत कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. जया बच्चन यांच्या या विधानाने दोघांचीही प्रेम कहाणी संपली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List