Vidhan Sabha Election : फडणवीसांच्या हातात आता फक्त 3 दिवस, भाजप ‘तो’ प्लॅन महाराष्ट्रातही लागू करणार?

Vidhan Sabha Election : फडणवीसांच्या हातात आता फक्त 3 दिवस, भाजप ‘तो’ प्लॅन महाराष्ट्रातही लागू करणार?

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. सध्या तरी बंडखोरी हीच महायुतीसमोरील राज्यातील सर्वात मोठी डोकेदुखी आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना आयोजित बैठकीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून राज्यात बंडखोरी टाळण्याच्या सूचना राज्यातील नेतृत्वाला करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील निवडणुका होणार आहेत.

दरम्यान झारखंडमध्ये ज्या नेत्यांना तिकीट मिळाले नव्हते, त्यांची बंडखोरी रोखण्यात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना मोठ्या प्रमाणात यश आलं आहे. त्यांनी बंडखोरांशी चर्चा करून त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले आहे. मात्र महाराष्ट्रात सध्या झारखंडच्या उलट स्थिती आहे. राज्यात भाजप सोबतच महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील अनेक जणांनी बंडखोरी केल्याचं पाहयला मिळत आहे. बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत.

एकीकडे फडणवीसांनी जागा वाटपाचा तिढा यशस्वीरित्या सोडवला आहे. मात्र आता पक्षांतर्गत झालेली बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. फडणवीसांनी देखील तिकीट न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान इच्छूक उमेदवारांच्या बंडखोरीमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. भाजपमध्ये निर्माण झालेल्या या बंडखोरीचा फटका हा या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मित्रपक्षांना देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे.

भाजप वापरणार झारखंडची रणनीती?

महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील निवडणूक होणार आहे. हे दोन्ही राज्य भाजपसाठी महत्त्वाचे आहे. झारखंडमध्ये बंडखोरी रोखण्यात भाजपला मोठ्याप्रमाणात यश आलं आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही बंडखोराचं बंड थंड झालं नाही. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी सांगितलं की,आमच्या हातात अजून तीन दिवस आहे, ज्या ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली त्या -त्या मतदारसंघातील भाजपचे वरिष्ठ नेते बंडखोरांशी संवाद साधत आहेत.शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचे सर्व बंडखोर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

LadKi Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट LadKi Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट
गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात...
‘फटाके एवढे वाजवा की त्याचा आवाज बांद्रापर्यंत पोहोचवा’, रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी
Geeta Kapur : ‘माझ्या आयुष्यात कधी कोण पुरुष…’, प्रसिद्ध कोरियोग्राफर गीता कपूर अजून अविवाहित का?
Sunny Deol : सनी देओलने त्या अभिनेत्रीला जवळ घेणं, मुलाला सहनच झालं नाही, तो थेट…
सुशांत मला सतत…, अभिनेत्यासोबत असलेले ‘प्रेमसंबंध’ मान्य करत साराचा खळबळजनक खुलासा
बद्धकोष्ठता दूर करायची मग ‘हे’ फळ भिजवून खा, लगेचच दिसतील परिणाम
काटेकोर डाएट, हेल्थी जेवण तरीही कमी वयात आजार; समंथापासून ते निक जोनसपर्यंत कित्येक बडे सेलिब्रिटी डायबिटीज पेशंट