Assembly Election 2024 – मिंधेचा दापोली गड ढासळला; वणौशी सुतार वाडीने हाती घेतली शिवसेनेची धगधगती मशाल

Assembly Election 2024 – मिंधेचा दापोली गड ढासळला; वणौशी सुतार वाडीने हाती घेतली शिवसेनेची धगधगती मशाल

एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे, दुसरीकडे दापोलीतील मिंधे गटाला खिंडार पडून मिंधेचे गड भुईसपाट होत चालले आहेत. मिंधे गटात कार्यरत असलेली दापोली विधानसभा मतदार संघातील मोठ्या लोक संख्येची गावे, वाडया, वस्त्या आणि पाड्यातील माणसे ऐन विधानसभा निवडणुकीत मिंधे गटाला रामराम ठोकून सरळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे मिंधेची चांगलीच तंतरली आहे.

दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी दापोली शहरातील नामदेव मंदिर सभागृहात वणौशी तर्फे नातू या गावातील सुतार वाडीने मिंधे गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना भक्कम साथ देण्यासाठी दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे नातू येथील सुतार वाडीचे अध्यक्ष मंगेश भिकु गिम्हवणेकर यांच्यासह अनिकेत हनुमंत चिंचघरकर, सुयोग चिंचघरकर, संदेश चिंचघरकर, समीर चिंचघरकर, श्रेया चिंचघरकर, निलेश चिंचघरकर, योगेश चिंचघरकर, संकेत चिंचघरकर, रूपेश गिम्हवणेकर आदी प्रमुख सदस्यांसह वाडीने शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत उर्फ भाई मोकल, दिपक चिंचघरकर, शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, सचिन तोडणकर, अर्जुन शिगवण, रविंद्र कालेकर, शिवसेना महिला आघाडी उप जिल्हा संघटीका मानसी विचारे, तालुका संघटक रमेश पांगत, शहर प्रमुख संदिप चव्हाण, विभाग प्रमुख तृशांत भाटकर, रमेश बहिरमकर, शैलेश पांगत, वंदना धोपट, रविंद्र घडवले, एम.आर.शेटये, नईम हूनेरकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा, शर्ट बदलून पुन्हा घटनास्थळी आला होता शूटर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा, शर्ट बदलून पुन्हा घटनास्थळी आला होता शूटर
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने...
हिटमॅनच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन, रोहित आणि रितीका यांना पुत्ररत्नाचा लाभ
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं होतं ‘वन नाईट स्टँड’; न बोलवताच पार्टीत पोहोचली दारू पेऊन बेशुद्ध, नशेतच दिला लग्नाला होकार
माझ्या अंगात प्राण आहे तोपर्यंत महाराष्ट्र लुटायला देणार नाही, उद्धव ठाकरे गरजले
Champions Trophy – ICC ने पाकिस्तानला ठणकावले, PoK मध्ये ट्रॉफी नेण्यास मनाई
मुख्यमंत्री कपड्याने योगी आहेत, विचारांनी नाही; अखिलेश यादव यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका
अमेरिकेत दरवर्षी किती लोकांना मिळतं ग्रीन कार्ड? यात हिंदुस्थानी नागरिकांची किती आहे संख्या? जाणून घ्या