Bajaj Housing Finance Share – नवा विक्रम करणार; शेअर 800 पार जाण्याची शक्यता

Bajaj Housing Finance Share – नवा विक्रम करणार; शेअर 800 पार जाण्याची शक्यता

सध्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आयपीओ चांगला नफा मिळवून देत आहेत. आता नुकत्याच आलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तसेच या आयपीओने लिस्टिंगच्यावेळीच गुंतवणूकदारांना तब्बल दुप्पट नफा मिळवून दिला आहे. या आयपीओची इश्यूप्राइस 70 रुपये होती. लिस्टिंगच्या वेळी याची किंमत 150 वर गेली. तसेच लिस्टिंगनंतर यात दमदरा तेजी दिसत आहे. त्यामुळे हा शेअर विक्रम करण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हा शेअर 800 रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बजाज हाउसिंग या शेअरची लिस्टिंग सोमवारी 16 सप्टेंबर रोजी झाली. तेव्हा 150 रुपयांना लिस्टिंग झालेल्या या शेअरमध्ये तेजी दिसत असून आता हा शेअर 180 रुपयांपर्यंत गेला आहे. या तेजीमुळे या शेअरला अप्पर सर्किच लागत आहे. आता हा शेअर मल्टीबॅगर ठरत गुंतवणूकदरांना जबरदस्त परतावा देईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लिस्टिंग झाल्यानंतर सोमवारी शेअरमध्ये तेजी होती. तसेच मंगळवारी हा शेअर 180 रुपयांपर्यंत पोहचला होता. आता हा शेअर 165 ते 175 या किंमतीत मिळत असल्यास तो घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच दीर्घकाळसाठी हा शेअर घेणाऱ्यांना जबरदस्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालावधीत हा शेअर 800 रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोविंदाच्या प्रकृतीसाठी लेकीकडून खास पूजा; महाकालच्या 51 पंडितांकडून महामृत्युंजय जप गोविंदाच्या प्रकृतीसाठी लेकीकडून खास पूजा; महाकालच्या 51 पंडितांकडून महामृत्युंजय जप
परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी पहाटे अभिनेता गोविंदा जखमी झाला. गोविंदाच्या पायाला गोळी लागली असून रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्याच्यावर...
मलायका आरोराचं मराठीत पदार्पण; तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’मध्ये पहायला मिळणार जलवा
Devendra Bhuyar – तीन नंबरचा गाळ…, अजितदादांच्या आमदाराचं महिलांबद्दल वादग्रस्त विधान
चांगले गणवेश दिले नाही, तर किमान चांगले अन्न तर द्यावे! अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
हाँगकाँगहून दिल्लीत Iphone 16 pro max ची तस्करी; महिलेला अटक
‘या’ व्यक्तीला पंतप्रधानपदावर बसलेलं पहायचंय! विनेश फोगाटनं व्यक्त केलं मत, सांगितलं कारण
अमित शहांना स्वप्नदोष झाला आहे – संजय राऊतांचा टोला