अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लीप जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट, म्हणाले…

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लीप जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट, म्हणाले…

राष्ट्रवादीचे नेते, कळवा- मुंब्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप ट्विट केलं आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा प्रत्यक्षदर्शीची ऑडिओ क्लीप असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

संभाषण काय आहे?

कथित प्रत्यक्षदर्शी : अस-सलाम-अलैकुम

दुसरी व्यक्ती : वा-अलैकुम-सलाम

कथित प्रत्यक्षदर्शी : भाई मी तुम्हाला एक व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. पण नंतर मी घाबरलो आणि ते डिलीट केलं.

दुसरी व्यक्ती : का?

कथित प्रत्यक्षदर्शी : ते काय झालं ना… अक्षय शिंदेचा जो मर्डर झाला. त्याच्या मागे माझीच गाडी होती. मी काही करू शकलो नाही. म्हटलं तुम्हाला सांगावं. पण मग विचार केला की काही चुकीचा मेसेज नको जायला. माझ्या मागे गोष्टी लागायला नको.

दुसरी व्यक्ती : व्हीडिओ होता का तुमच्याकडे?

कथित प्रत्यक्षदर्शी : नाही व्हीडिओ नाहीये. पण मी आणि मेव्हणा एका रॅलीला जात होतो. मुंब्रा बायपासवरून जात होतो. तेव्हा एक व्हॅन पाठीमागून आली. त्या व्हॅनला पडदे लावले होते. गाडीतून ठक करून आवाज आला. आम्हाला वाटलं की गाडीचा पाटा वाजला असेल. मग पुन्हा आवाज आला. मग मी घाबरलो. म्हटलं काही तरी इश्यू असेल. तेव्हा पोलिसांनी गाडी थांबवली. दोन पोलीसवाले बाहेर आले. मग पुन्हा त्यांनी व्हॅन बंद केली. मग तिसरा आवाज आला. तेव्हा आम्ही घाबरलो. त्यांना ओव्हरटॅक केलं आणि निघून गेलो. ते कळव्याकडे गेले आणि आम्ही जंक्शनकडे गेलो.

अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर रोजी एन्काऊंटर करण्यात आला. पण हा एन्काऊंटर कुठे करण्यात आला? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. त्यात हा एन्काऊंटर होत असताना तिथे उपस्थित असणारा प्रत्यक्षदर्शी आणि एका पत्रकाराचा ऑडिओ क्लिप शेअर केला आहे. त्यात अक्षय शिंदेचा एनकाऊंटर हा मुंब्रा बायपास रोडवरील हजरत सय्यद फकीर शहा बाबा दरगाहच्या पुढे काही अंतरावर झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने त्या ऑडिओ क्लिपमध्ये दिली आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही 9 मराठी करत नाही.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांच्या या आरोपांना उत्तर दिलं आहे. अफवा पसरवण्यात हातकंडा असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कथित ऑडिओ क्लिप पसरवली जात आहे.पोलिसांची व सरकारची प्रतिमा मालिन करण्यासाठी आव्हाड साहेबाकडून ही क्लिप स्क्रिप्टेड बनवलेली वाटत आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ याची चौकशी करावी, असं सूरज चव्हाण म्हणालेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस सोडा सणासुदीत पगार तरी मिळेल की...
अमेरिकेत नको तर..; कॅन्सरवरील उपचाराबद्दल हिना खानला महिमा चौधरीने दिला सल्ला
IIFA 2024: सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख, तर अभिनेत्री राणी मुखर्जी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
IIFA Awards 2024: बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचा बोलबाला, हॉलिवूडकडे ‘बादशाह’ का फिरवतो पाठ? कारण समोर
IIFA Awards 2024: पाच फिल्म इंडस्ट्रीजचा भव्यदिव्य उत्सव; 3 दिवसांच्या ‘आयफा अवॉर्ड्स’मध्ये काय काय पहायला मिळणार?
ती जागा जेलसारखी..; पलकच्या आरोपांनंतर ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर भडकली जेनिफर
वाढीव टप्प्याचा आदेश काढा; अन्यथा आम्हाला गोळ्या घाला, विनाअनुदानित शिक्षकांचा उद्विग्न सवाल