Supriya Sule : हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने नाही तर… सुप्रिया सुळे यांनी भाजपला दाखवला असा आरसा

Supriya Sule : हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने नाही तर… सुप्रिया सुळे यांनी भाजपला दाखवला असा आरसा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. हा देश दडपशाही आणि अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.  TV9 मराठीच्या गणपत्ती बाप्पाची आरती आज सुळे यांच्या हस्ते झाली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली.

अरविंद केजरीवाल लढवय्ये

इनकम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या आयसीई या पद्धतीने भाजपविरोधातील लोकांना त्रास देण्यात येतो. अशा लोकांवर चुकीच्या केसेस करून त्या पद्धतीने त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये नुसते सहभागी नाही येत महत्त्वाच्या राजकीय पदावर त्यांची वर्णी लागते. त्यामुळे ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल लढले त्यांना चुकीच्या केसेस करून त्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला जेलमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर झारखंड सीएमच्या बाबतीत असच करण्यात आलं आणि केसेस जेव्हा येतात म्हणजे मग तुम्ही अनिल देशमुखांची केस बघा राऊत साहेबांची बघा. नवाब मलिकांची बघा. या सगळ्या येतात किंवा कुठलाच आरोप त्याच्यातला म्हणजे जो असतो तो अर्ध्या कडून जास्त वेळा पॉलिटिकल असतो किंवा मग बीजेपीचा वॉशिंग मशीन आहे तुम्हाला 90% लोकं आज भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये नुसते सहभागी नाहीयेत महत्त्वाच्या राजकीय पदावर ही आहेत, असा आरोप त्यांनी केला. एजन्सींचा इतका गैरवापर स्वातंत्र्यानंतर या ट्रिपल इंजिन सरकारच्या काळात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अरविंद केजरीवाल हे लढवय्ये असल्याच्या त्या म्हणाल्या.

हा देश मनमनीने चालत नाही

हा देश हा कोणाच्या मनमानीने अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही. तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो आणि आज संविधानाने चालला पाहिजे आणि या भारताच्या दिल्ली मधून लोकांनी निवडून दिलेला आहे आणि मेरिट अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झालेत आणि शून्यातून त्यांनी आम आदमी पक्षाचे विश्व निर्माण केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी पंजाब लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे त्यांची शुगर मला अजूनही आठवतं त्यांच्या कुटुंबाची आमचे खूप फार जवळचे संबंध आहेत. त्यांची शुगर अनेकदा वाढली. त्यांना भोवळ आली. पण हे सरकार असंवेदनशील आहे. हा सगळा प्रकार क्रूर असल्याच्या त्या म्हणाल्या.

जगदीप धनखड यांना अगोदर का सूचलं नाही

राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावर राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी विरोधी मत नोंदवलं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की ते एका मोठ्या पदावर आहेत. ते अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते. मग त्यावेळी त्यांना या गोष्टीची जाणीव झाली नाही का? आज सोयीसाठी आणि पदासाठी, तुमच्या नेत्यांना खूश करण्यासाठी तुम्ही इतकं कॉम्प्रमाईज करता? असा टोला त्यांनी लगावला.

गडकरींनी कधी गलिच्छ राजकारण केलं नाही

नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षाने त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याच्या वक्तव्यावर सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षाने अशी ऑफर दिली का याबाबत माहिती नसल्याने त्यावर प्रतिक्रिया देता येणार नाही पण पण एक गोष्ट करीन की गडकरी यांच्याशी जरी आमचे वैचारिक मतभेद असतील तरी अतिशय संस्कृत नेता ज्यांनी कधीच गलिच्छ राजकारण केलं नाही, असे कौतुक केले. त्यांनी स्वतःच्या वैचारिक भूमिकेत बदल केला नाही. संघर्ष करायची तयारी, त्यांनी सत्तेसाठी कॉम्प्रमाईज केले नाही. हे खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि या देशांमध्ये कधीही आम्ही जरी वैचारिक विरोधक असले तरी आमचे कौटुंबिक संबंध किंवा वैयक्तिक संबंध तुम्ही आज जर पार्लमेंट मध्ये मतदान केलं तर सगळ्यात पॉप्युलर आणि लाडका मंत्री कोण आहे तर ते गडकरी असल्याचे त्यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्रीच…शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्रीच…शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी महायुतीमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा...
महायुती सरकार महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे लिहिणार का? विजय वडेट्टीवार यांचा संताप, सरकारवर घणाघात
नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, 112 ठार; कोसीची पाणीपातळी वाढल्याने बिहारही जलमय, 56 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी लावलेले आयईडी डिफ्युज करताना स्फोट , CRPF चे पाच जवान जखमी
महाराष्ट्र विक्री आहे! जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात; अंबादास दानवेंचा मिंधे सरकारवर हल्लाबोल
‘हेलेन’चा अमेरिकेत तर मॅक्सिकोमध्ये ‘जॉन’ चक्रीवादळाचा धुमाकूळ, 50 हून अधिक लोकांचा मृत्यू
लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ