बिग बॉसच्या घरात शिवरायांचा जयजयकार का केला नाही? अखेर अरबाज पटेलने दिलं उत्तर

बिग बॉसच्या घरात शिवरायांचा जयजयकार का केला नाही? अखेर अरबाज पटेलने दिलं उत्तर

‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातून नुकताच अरबाज पटेल बाहेर पडला. स्प्लिट्सविला फेम अरबाज बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेरही चांगलाच चर्चेत होता. निक्की तांबोळीसोबतची जवळीक आणि घरातील आक्रमकपणा यामुळे त्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. बिग बॉसच्या घरात असताना तो आणखी एका कारणामुळे ट्रोलिंगचा शिकार झाला होता. बिग बॉसमधून जेव्हा पुरुषोत्तम दादा पाटील बाहेर पडले, तेव्हा सर्वांसोबत मिळून अरबाजने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करत नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यावर आता त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

जेव्हा बिग बॉसच्या घरातून कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर पडले, तेव्हा निरोप घेताना त्यांनी अनेक घोषणा दिल्या होत्या. सुरुवातीला संतांचा जयजयकार आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. त्यांच्यापाठोपाठ घरातील इतर सदस्यांनीही घोषणाबाजी केली होती. मात्र अरबाज पटेल शांत उभा होता. यावरूनच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

अरबाज पटेलचं स्पष्टीकरण-

“हे सगळं कधी घडलं मला माहीत नाही. कारण मी तसा नाही. मी संभाजीनगरमध्ये राहतो. सर्वांनाच माहीत आहे की ती जागा ऐतिहासिक आहे. आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहोत. मी बिग बॉसच्या घरात असताना माझ्याच विचारांमध्ये मग्न असायचो. त्यामुळे हे सगळं कधी घडलं मला कळलंच नाही. मी धर्म धरून राहिलो असतो तर बिग बॉसमध्ये कशाला आलो असतो. मी तसा नाहीये. मी सगळ्याच धर्माच्या बाबतीत संवेदनशील आहे. जर लोकांची माझ्यावर नाराजी असेल तर मी त्यांची माफी मागतो”, असं तो ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaz Shaikh (@mr.arbazpatel)

अरबाजच्या एलिमिनेशननंतर ढसाढसा रडली निक्की-

गेल्या आठवड्यात वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि अरबाज पटेल या पाच जणांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. त्यापैकी कॅप्टन अरबाजला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. कॅप्टनच एलिमिनेट होण्याची बिग बॉस मराठीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी सर्वाधिक मतं सूरजला होती. तर वर्षा आणि जान्हवी यांनासुद्धा पुरेशी मतं मिळाली होती. अरबाज आणि निक्की हे दोघं डेंजर झोनमध्ये होते. ही जोडी बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर तुफान चर्चेत राहिली आहे. यानंतर अखेर अरबाजला बाद व्हावं लागलं होतं. बिग बॉसच्या घरात निक्कीला अरबाजचाच आधार होता, त्यामुळे त्याच्या एलिमिनेशनचं कळताच ती ढसाढसा रडू लागली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही – हायकोर्टचा इशारा Akshay Shinde Encounter : चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही – हायकोर्टचा इशारा
बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र या एन्काऊंटरवर...
Akshay Shinde Encounter : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या?; कोर्टात वकिलाचा मोठा युक्तिवाद काय?
Akshay Shinde Encounter: हे एन्काऊंटर होऊच शकत नाही, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
Akshay Shinde Encounter Hearing : तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारी वकिलांना घेतलं फैलावर
कधी कधी काही शिक्षा वेगळ्या पद्धतीने होतात…पंकजा मुंडेंनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रथमच केले भाष्य
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरआधी अक्षयने आईवडिलांकडे 500 रुपये मागितले, देहबोली कशी होती? बोलणं काय झालं?; वकिलाचा मोठा युक्तिवाद काय?
Sharmila Thackeray : अक्षय शिंदे कोणी संत नाही, असे एन्काऊंटर झाले पाहिजेत, शर्मिला ठाकरेंची रोखठोक भूमिका