Dharavi Mosque : ‘ओम असू द्या, आमिन असू द्या’, मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावर एक धारावीकर स्पष्टपणे म्हणाला….

Dharavi Mosque : ‘ओम असू द्या, आमिन असू द्या’, मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावर एक धारावीकर स्पष्टपणे म्हणाला….

मुंबईत धारावीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. धारावीत एका मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरुन ही स्थिती निर्माण झाली आहे. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई महापालिकेच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. धारावीत मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेचे पथक प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी दाखल झाल्यानंतर हा तणाव निर्माण झाला. तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने या संपूर्ण विषयाबद्दल माहिती दिली.

प्रत्यक्षदर्शीने जे सांगितलं ते जसच्या तसं

“या ठिकाणी एक मशीद आहे. ती अनधिकृत आहे, या नावाखाली महापालिका कारवाईसाठी आली आहे. ही कारवाई महापालिकेच्या दृष्टीने प्रलंबित होती. आम्ही त्यांना हेच सांगतोय, भरपूर दिवसापासून धारावी पूनर्वसन प्रकल्प सुरु आहे. अदानीच्या माध्यमातून सर्वे सुरु आहे. आम्ही धारावी बचावच्या माध्यमातून त्या विरोधात लढत आहोत. या ठिकाणी अधिकृत अनधिकृत, पात्र-अपात्रतेच्या माध्यमातून कारवाई झाली नाही पाहिजे” असं हा प्रत्यक्षदर्शी म्हणाला.

“तरी सुद्धा पालिकेच पथक प्रार्थना स्थळ तोडण्यासाठी आलं. एक धारावीकर म्हणून सांगू इच्छितो, आम्ही हिंदू-मुस्लिम सोबत आहोत. ओम असू द्या, आमिन असू द्या, राम असू द्या, रहीम असू द्या आम्ही सर्व सण एकत्र साजरे केलेत. आज जी कारवाई होतेय ती राजकारणाशी प्रेरित आहे. यांना शांतता-सुव्यवस्था बिघडवायची आहे. हे सर्व पालिका-पोलिसांच्या हाती आहे” असं हा प्रत्यक्षदर्शी म्हणाला.

“धारावीत पूनर्वसन प्रकल्प सुरु आहे. धारवीचं सगळं कंस्ट्रक्शन तुटणार आहे. त्यामुळे अनधिकृतच्या नावाखाली प्रार्थनास्थळावर कारवाई करत असाल, एक धारावीकर म्हणून शातं बसणार नाही. सगळे निषेध करण्यासाठी जमले आहेत. शांतता हवी आहे की, कायदा-सुव्यवस्था बिघडवायची आहे? याची पूर्ण जबाबदारी पालिकेची आहे. एका धारवीकर म्हणून ही कारवाई होऊ देणार नाही” असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

याआधी नोटीस दिली होती का? या प्रश्नावर त्याने सांगितलं की, “याआधी नोटीसा दिलेल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही अनधिकृतच्या नावाने तक्रारी केल्या, तेव्हा पालिकेकडून सांगण्यात आलं की, धारावी पूनर्वसन प्रकल्प डीआरपीडेकडे आहे. डीआरपीडेने सांगितलं, तर कारवाई करु. पालिकेने मोठा भ्रष्टाचार केलाय. प्रार्थना स्थळावर कारवाई करणारं असाल, तर ते चुकीच आहे”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मोहब्बतें’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याचा अपघात, नवरा थेट ICU मध्ये, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर ‘मोहब्बतें’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याचा अपघात, नवरा थेट ICU मध्ये, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्री फेम प्रिती झंगियानीच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली. रिपोर्टनुसार प्रिती...
वर्षा उसगांवकर यांच्यासोबत मोठा घात, अभिनेत्रीने अनेक प्रयत्न करूनही…
निधी वाटपात भाजपचे हर्षवर्धन, भेगडे, बुचके यांच्यावर फुली! संभाव्य बंडखोरीमुळे अजित पवार गट सावध
चंद्रपुरात 7 वर्षाच्या भावेशला बिबट्यानं उचलून नेलं; वन विभागाला जंगलात मुंडकं सापडलं
Nagar accident news – जखमींना रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेचा अपघात; तीन ठार, दोघे जखमी
जगभरातून महत्वाच्या बातम्या
IND vs BAN – ऋषभ पंत ‘टेस्ट’मध्ये पास, 633 दिवसांनंतर कमबॅक करत शतक ठोकलं, धोनीशी बरोबरी