नवरात्रोत्सवात महालक्ष्मी, भायखळा येथून बेस्टच्या विशेष गाडय़ा

नवरात्रोत्सवात महालक्ष्मी, भायखळा येथून बेस्टच्या विशेष गाडय़ा

नवरात्रोत्सवात मोठय़ा संख्येने भाविक मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात येत असतात. महालक्ष्मी व भायखळा स्थानक रेल्वे स्थानकापर्यंत लोकलने येऊन पुढील प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाच्या बसगाडय़ांचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर बेस्टच्या विशेष गाडय़ा  3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत चालविण्यात येणार आहेत. बेस्ट बसमार्ग 37, 57, 151, ए-63, ए-77, ए-77 जादा, ए-357, 83 या बसमार्गावर दररोज 23 अतिरिक्त बसगाडय़ा चालवण्यात येतील. भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱयांची बस स्थानकावर नियुक्ती करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त लोकल प्रवाशांसाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) येथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरिता गर्दीच्या वेळी लालबाग, चिंचपोकळी रेल्वे स्थानकमार्गे विशेष बससेवा चालवण्यात येणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले, दोन पायलटसह तिघांचा मृत्यू पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले, दोन पायलटसह तिघांचा मृत्यू
बावधन परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिकांसह एका अभियंत्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत हेलिकॉप्टर जळून खाक झाले. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या...
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
Badlapur Sexual Assault : कोर्टाने फटकारताच चोवीस तासांत कोतवाल आणि आपटेला अटक
उपोषणाचे हत्यार उपसताच सोनम वांगचूक यांची सुटका, पंतप्रधान मोदी, शहा यांचे भेटण्याचे आश्वासन
10 ऑक्टोबरला महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा?
पंतप्रधान मोदींचा फोन मी नाकारला, कुस्तीपटू विनेश फोगाटचा दावा
इस्रायलने केली जमिनीवरील युद्धाची घोषणा, हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांशी चकमक; गाझातही हल्ले, 51 जणांचा मृत्यू