Kangana Ranaut: कंगना आर्थिक संकटात, विकावा लागला मुंबईतला बंगला; कारण काय?

Kangana Ranaut: कंगना आर्थिक संकटात, विकावा लागला मुंबईतला बंगला; कारण काय?

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत तिचा ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार होता, मात्र शेवटच्या क्षणी त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे. कंगना राणौतने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कंगना रणौतने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाविषयी बरेच काही सांगितले. यापैकी एक म्हणजे या चित्रपटासाठी त्यांना आपला बंगला विकावा लागला. नुकतीच बातमी आली होती की, कंगनाने मुंबईतील तिचा पाली हिल बंगला विकण्याची योजना आखली आहे.  इमर्जन्सी चित्रपटासाठी तिने आपली सर्व संपत्ती गुंतवली असल्याचे म्हटले आहे.

मुंबईतील बंगला विकला

कंगनाती ही मुंबईतील मालमत्ता तेव्हा चर्चेत आली होती. जेव्हा मुंबई महापालिकेने त्या बंगल्यावर तोडक कारवाई केली होती. 2020 मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) त्याचा काही भाग पाडला होता. जेव्हा कंगनाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी तिचा वाद झाला होता. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात तिचा बंगल्याचा काही भाग पाडण्यात आला. बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा बीएमसीने केला होता आणि त्यामुळे तो पाडण्यात आला. तोडफोडीनंतर कंगनाला 2 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती जी तिने घेण्यास नकार दिला.

2020 मध्ये कंगनाने वांद्रे येथील पाली हिल भागातील तिची बहुमजली मालमत्ता 32 कोटी रुपयांना विकल्याचे समोर आले होते. याबाबत अभिनेत्री म्हणाली की, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या रिलीजला उशीर झाल्यामुळे तिचे पैसे अडकले असल्याने तिला हे करावे लागले.

कंगनाने या मालमत्तेचा वापर तिच्या निर्मिती कंपनी ‘मणिकर्णिका फिल्म्स’साठी कार्यालय म्हणून केला असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर अभिनेत्री म्हणाली, इमर्जन्सी हा माझा चित्रपट होता जो रिलीज होणार होता, त्यामुळे या चित्रपटासाठी मी माझी संपत्ती पणाला लावली आणि आता तो सिनेमा अजून रिलीज झालेला नाही.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

KBC 16 : अखेर अमिताभ बच्चन यांच्या ओठावर ती गोष्ट आलीच; बिग बी म्हणाले, ती इच्छा अपुरीच राहिली… KBC 16 : अखेर अमिताभ बच्चन यांच्या ओठावर ती गोष्ट आलीच; बिग बी म्हणाले, ती इच्छा अपुरीच राहिली…
‘कौन बनेगा करोड़पति 16’लाही अत्यंत उदंड प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 24 वर्षापासून महानायक अमिताभ बच्चन हा शो करत आहेत. एवढ्या...
बदलापूर प्रकरणात फरार असलेले सहआरोपी शाळेचे संस्थापक आणि सचिवांना अटक
गृहमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी खराब, सुप्रिया सुळे यांची टीका
Mumbai News – हाजीअली दर्गा उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, हरियाणातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
वाराणसीपाठोपाठ लखनौमध्येही साईबाबा हटाओ मोहीम! अखिल भारतीय हिंदू महासभेचा फतवा
अटल सेतूवरून आणखी एकाची उडी, मानसिक तणावातून व्यावसायिकाने जीवन संपवले
Ind Vs Ban Test Series 2024 – हिंदुस्थानने बांगलादेशवर विजय मिळवताच, रमीझ राजा यांची प्रतिक्रिया चर्चेत