ठाणे परिवहनच्या बसला आग, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

ठाणे परिवहनच्या बसला आग, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

ठाणे येथील चेंदणी कोळीवाडा डेपो कडून दिवा खिडकाळी बस डेपोकडे निघालेल्या ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या एका प्रवासी बसला आग लागली. सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंब्रा, किस्मत कॉलनी येथे या बसला आग लागली. यावेळी बसमध्ये सुमारे 90 ते 100 प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याची बाब वेळीच बसच्या वाहन व चालक या दोघांच्या लक्षात आल्याने त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बसमधून बाहेर उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर लागलेली आग अवघ्या दहा मिनिटांत नियंत्रणात आणण्यात ही यश आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

अपघातग्रस्त टीएमटी बस ही बसचालक केतन वाघचौडे आणि वाहक दयानंद दांडेकर हे दोघे सायंकाळी चेंदणी कोळीवाडा डेपोमधून घेऊन दिवा खिडकाळी डेपोला निघाले होते. ती बस सुमारे 90 ते 100 प्रवाशांनी खचाखच भरली होती. बस मुंब्रा किस्मत कॉलनी येथे येताच त्या बसच्या मागील बाजूस असलेल्या इंजिन कंपार्टमेंट मध्ये आग लागली. ही बाब लक्षात येताच, चालक वाघाचौडे यांनी बस बाजूला घेऊन वाहक दांडेकर यांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना सुखरूप बसमधून खाली उतरवले. तसेच त्यांनी आगीची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस, ठामपा परिवहन कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच लागलेल्या आगीवर अवघ्या काही मिनिटांत नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थान…; संजय राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थान…; संजय राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा
गायींना ‘राज्यमाता’ दर्जा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा...
स्वत:च्या मुलीचे लग्न लावले; इतरांच्या मुलींना संन्यासी राहायला का सांगता?; मद्रास हायकोर्टाचा जग्गी वासुदेव यांना सवाल
मंदिर असो वा दर्गा, बेकायदा बांधकामे पाडून टाका! सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
महागाईची ऑक्टोबर हीट, गॅस दोन महिन्यांत तिसऱ्यांदा महागला
अखेर पालिका कर्मचाऱ्यांचा पगार 1 तारखेला झाला, आदित्य ठाकरे यांचा पाठपुरावा
शिवसेनेचा शनिवारी पार्ल्यात ‘महा नोकरी’ मेळावा, हजारो बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
सिडकोच्या कोंढाणे धरणात मिंधे सरकारचा 1400 कोटींचा महाघोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील मेघा इंजिनीअरिंग लाभार्थी