Bigg Boss 18 : ‘बिग बॉस 18’ साठी हे कलाकार दिसणार, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकाचे नावही उघड

Bigg Boss 18 :  ‘बिग बॉस 18’ साठी हे कलाकार दिसणार, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकाचे नावही उघड

सलमान खानचा मोस्ट अवेटेड शो ‘बिग बॉस 18’ बाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. बिग बॉस 18 चा पहिला प्रोमो समोर आला असून यावेळच्या थीमचाही खुलासा झाला आहे. हा शो ऑक्टोबर पासून सुरू होणार असून आता या शोमधील स्पर्धकांची नावेही समोर येऊ लागली आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस 18’ यावेळी 5 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. बिग बॉसच्या प्रोमोमध्ये यावेळी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यातील टीम्सवर आधारीत आहे. आता ‘बिग बॉस 18’ च्या कन्फर्म केलेल्या काही स्पर्धकांची यादी देखील आली आहे ज्यामध्ये शोच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याचे नाव देखील समोर आले आहे.

वृत्तानुसार, ‘बिग बॉस 18’ साठी निया शर्मानंतर आता धीरज धूपर आणि शोएब इब्राहीम यांची नावे समोर आली आहेत. मात्र शोएबने यासाठी शो साठी नकार दिला आहे. धीरज धूपर ‘बिग बॉस 18’ मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक असणार आहे. त्याला 5 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली आहे. यावेळी ‘बिग बॉस 18’ घरात 18 स्पर्धक असणार आहेत यात आता इशा कोपीकरच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. याशिवाय चंद्रिमा सिंघा रॉय आणि अभिनेत्री चाहत पांडेही दिसणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थान…; संजय राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थान…; संजय राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा
गायींना ‘राज्यमाता’ दर्जा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा...
स्वत:च्या मुलीचे लग्न लावले; इतरांच्या मुलींना संन्यासी राहायला का सांगता?; मद्रास हायकोर्टाचा जग्गी वासुदेव यांना सवाल
मंदिर असो वा दर्गा, बेकायदा बांधकामे पाडून टाका! सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
महागाईची ऑक्टोबर हीट, गॅस दोन महिन्यांत तिसऱ्यांदा महागला
अखेर पालिका कर्मचाऱ्यांचा पगार 1 तारखेला झाला, आदित्य ठाकरे यांचा पाठपुरावा
शिवसेनेचा शनिवारी पार्ल्यात ‘महा नोकरी’ मेळावा, हजारो बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
सिडकोच्या कोंढाणे धरणात मिंधे सरकारचा 1400 कोटींचा महाघोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील मेघा इंजिनीअरिंग लाभार्थी