जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

‘एसबीआय’मध्ये 1511 पदांची भरती सुरू

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)मध्ये ‘स्पेशालिस्ट पॅडर ऑफिसर्स’च्या एपूण 1 हजार 511 पदांसाठी नियमित स्वरूपात भरती केली जात आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे. ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. या जागा मुंबई आणि नवी मुंबईत भरल्या जाणार आहेत. अर्ज करणाऱया उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत असायला हवे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती एसबीआयच्या अधिपृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

यूपीआयवरच्या देवाण-घेवाणचा रेकॉर्ड

यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)चा वापर दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. सप्टेंबर 2024 मध्ये यूपीआयवरून दररोज सरासरी 50.1 कोटीहून जास्त रुपयांची देवाण-घेवाण करण्यात आली असून याचे एपूण मूल्य 68,899 कोटी रुपये इतके आहे. मासिक आधारावर सप्टेंबर 2024 मध्ये 0.5 टक्के वाढ 1504 कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली आहे. ऑगस्टमध्ये हा आकडा 1496 कोटी रुपये होता. आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टमच्या देवाण-घेवाणीमध्ये सप्टेंबर महिन्यात कोणताही बदल झाला नाही.

स्वस्तात आयफोन! उद्यापासून अॅपलचा सेल

हिंदुस्थानात सध्या अॅमेझॉनचा आणि फ्लिपकार्ट कंपनीचा एकाच वेळी सेल सुरू आहे. या दोन्ही सेलमध्ये वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर ग्राहकांना डिस्काऊंट मिळत आहे, परंतु आता 3 ऑक्टोबरपासून अॅपलचा सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अॅपलच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर आकर्षक सूट मिळू शकणार आहे. आयपह्न, आयपॅड आणि मॅकबुकवरही घसघशीत सूट मिळू शकणार आहे. अॅपल फेस्टिव्हल सीझन ऑफरमध्ये ग्राहकांना 6 हजारांपर्यंत बँक डिस्काऊंट मिळणार आहे. जुन्या प्रॉडक्ट्सवरसुद्धा एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.

‘थलैवा’ पोटदुखीनंतर रुग्णालयात दाखल

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना तीव्र पोटदुखीनंतर सोमवारी रात्री उशिरा चेन्नईमधील ओपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. 73 वर्षीय रजनीकांत यांची प्रपृती ठीक असून चिंता करण्याचे कारण नसल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली. अपोलो रुग्णालयाने आज निवेदन जारी करत रजनीकांत यांच्या प्रपृतीबाबतही माहिती दिली. त्यानुसार रजनीकांत यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी नस सुजली होती. सर्जरी न करता यावर उपचार करण्यात आले आहेत. कार्डीओलॉजिस्ट डॉक्टर साई सतीश यांनी रजनीकांत यांच्यावर उपचार केले असून रक्तवाहिनीला आलेली सूजही कमी झाली आहे. चाहत्यांना आणि त्यांच्या प्रपृतीसाठी प्रार्थना करणाऱयांना सांगण्यात आनंद होत आहे की रजनीकांत यांची प्रपृती स्थिर आहे. त्यांच्या प्रपृतीमध्ये सुधारणा झाली असून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

नेटवर्क नसतानाही कॉलिंग, इंटरनेट सुविधा मिळणार

नेटवर्कशिवाय कॉलिंग आणि इंटरनेट सुविधा देण्यासाठी सरकारकडून पावले टाकली जात आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने यासंबंधी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सॅटेलाईट इंटरनेट सेवेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे देशात सॅटेलाईट इंटरनेटच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सॅटेलाइट स्पेक्ट्रमसंदर्भात ट्रायने नुकतेच एक सल्लापत्र प्रसिद्ध केले आहे. या पेपरमध्ये सॅटकॉम स्पेक्ट्रम असाइनमेंटशी संबंधित 21 प्रश्नांचा समावेश होता. एकदा रोल केल्यावर का@लिंग, इंटरनेटची सुविधा सहज मिळू शकते. यावर भागधारक 18 ऑक्टोबरपर्यंत प्रतिसाद देऊ शकतात, असेही ट्रायने म्हटले आहे.

नेपाळमध्ये मृतांची संख्या 217 वर पोहोचली

नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या मृत्युमुखींची संख्या 217 वर पोहोचली आहे. अजूनही 28 लोक बेपत्ता आहेत, अशी माहिती एका अधिकाऱयाने दिली. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनेमुळे नेपाळच्या अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती उद्भवली आहे. अधिकाऱयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या 217, तर जखमींची संख्या 143 वर पोहोचली आहे. नेपाळमधील काठमांडूमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. नेपाळ पोलीससह 20 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

दक्षिण कोरियाने ‘पॉवर’ दाखवली

दक्षिण कोरियाने आपल्या भव्य सशस्त्र दल दिवसाच्या समारंभात आपल्या सर्वात शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाईल आणि अन्य शस्त्रांचे प्रदर्शन केले. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक यियोल यांनी उत्तर कोरियाला उघडपणे आव्हान दिले आहे. जर उत्तर कोरियाने परमाणू शस्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे शासन उद्ध्वस्त होईल. या वेळी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींनी हजारो सैनिकांसमोर जोरदार भाषण केले. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्याआधी दक्षिण कोरियाने हे शक्तिशाली शस्त्रांचे प्रदर्शन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिडकोच्या कोंढाणे धरणात मिंधे सरकारचा 1400 कोटींचा महाघोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील मेघा इंजिनीअरिंग लाभार्थी सिडकोच्या कोंढाणे धरणात मिंधे सरकारचा 1400 कोटींचा महाघोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील मेघा इंजिनीअरिंग लाभार्थी
विधानसभा निवडणूक जवळ येताच मिंधे सरकारचे घोटाळे अधिकाधिक गतिमान होऊ लागले आहेत. नवी मुंबईतील सिडकोच्या कोंढाणे धरण प्रकल्पात मिंधे सरकारने...
विदर्भात गुंतवणूक करायला कुणीही तयार नाही, गडकरींकडून गतिमान कारभाराची पोलखोल
बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश आणि खोटा निकाल! सायबर ठगांनी वर्धमान समूहाच्या अध्यक्षांना सात कोटींचा गंडा घातला
मालवण शिवपुतळा दुर्घटना; जयदीप आपटेला जामीन नाकारला
मुंबईत आढळला ‘झिका’चा रुग्ण, डेंग्यू, मलेरियाचाही विळखा
भाजपची हुकूमशाही… दिल्लीच्या सीमेवर सोनम वांगचुक यांना अटक
जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…