महाराष्ट्रात चाललंय तरी काय? संगमेश्वरामधील अनधिकृत वसतीगृहात तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार

महाराष्ट्रात चाललंय तरी काय? संगमेश्वरामधील अनधिकृत वसतीगृहात तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार

राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातच संगमेश्वर तालुक्यातील एका अनधिकृत वस्तीगृहात राहणाऱ्या तीन विद्यार्थिनींवर संस्थेच्या अध्यक्षांनीच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. संस्थेच्या ग्रंथपाल महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संस्था अध्यक्ष नयन मुळये (वय 67) त्यांचा मुलग प्रथमेश मुळये (वय36 ) शाळेचे मुख्याध्यापक संजय मुळये यांच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 67 वर्षीय संस्था चालकावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शाळेच्या ग्रंथपाल महिलेने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार संगमेश्वर तालुक्यातील मुलींचे वसतिगृह अनधिकृतपणे चालवले जाते. गणेश उत्सवा दरम्यान शाळेला सुट्टी असल्याने वसतिगृहात राहणाऱ्या एकूण 23 मुलींपैकी 20 मुली गणेशोत्सवासाठी आपल्या गावी गेल्या होत्या. तर यातील तीन मुली सुरुवातीचे काही दिवस तक्रारदार यांच्या घरी राहायला आल्या होत्या. मात्र तक्रारदार या कामानिमित्त पुणे येथे जाणार असल्याने तिन्ही मुलींनी संस्थाचालक नयन मुळये त्यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गणेशोत्सव संपेपर्यंत त्या मुली त्यांच्याकडेच राहत होत्या. या कालावधीत नयन मुळे यांच्या राहत्या घरी मुलींचा विनयभंग करण्यात आला. ही गोष्ट सुट्टी संपल्यानंतर मुलींनी ग्रंथपालांना सांगितली. त्यानुसार त्यांनी तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत संस्था अध्यक्ष नयन मुळये (वय ६७) त्यांचा मुलग प्रथमेश मुळये (वय ३६) शाळेचे मुख्याध्यापक संजय मुळये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटना गणेशोत्सवाच्या काळात घडली असून तीन पैकी एक मुलगी महाविद्यालयात व अन्य दोन मुली शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. पोलिसांनी तिन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. घटनेची सत्यता पडताळणी करून उचित कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या गुन्ह्याचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सोनम वांगचुक यांना अटक हा मोदी सरकारचा मूर्खपणा, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर सोनम वांगचुक यांना अटक हा मोदी सरकारचा मूर्खपणा, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर
केंद्रातील मोदी सरकारला भाजपचेच ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी घरचा आहेर दिला आहे. सोनम वांगचुक यांना करण्यात आलेल्या अटकेवर स्वामी...
परिणीती चोप्रा हिने शेअर केले पतीसोबतचे अत्यंत खास फोटो, अभिनेत्री रोमांटिक होत…
गरबा मंडपात गोमूत्र पाजून एण्ट्री द्या! भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य
धक्कादायक! बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना अतिरक्तस्त्राव होऊन तरुणीचा मृत्यू
वैयक्तिक रागातून सुपरमार्केटमध्ये चाकूहल्ला, तिघांचा मृत्यू तर 15 जण जखमी
Mumbai News – मद्यपान करताना वाद, बापाकडून मुलाची चाकूने भोसकून हत्या
ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण ठाकुर्लीदरम्यान लोकलसेवा रखडली