Ind Vs Ban Test Series 2024- आमची 100 धावांवर बाद होण्याची तयारी होती…; रोहित शर्मा स्पष्टचं बोलला

Ind Vs Ban Test Series 2024- आमची 100 धावांवर बाद होण्याची तयारी होती…; रोहित शर्मा स्पष्टचं बोलला

हिंदुस्थानने बांगलादेशचा कानपुरमध्ये पराभव करत दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. याचबरोबर टीम इंडियाचा हा सलग 18 वा कसोटी मालिका विजय ठरला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी टीम इंडियाने टी-20 स्टाईलमध्ये फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावरुन रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधताना महत्वाचं वक्यव्य केले आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे अखेरच्या अडीच दिवसांमध्ये टीम इंडियाने टी-20 स्टाईल फलंदाजी करत बांगलादेशच्या बत्त्या गुल केल्या. बांगालादेशने पहिल्या डावात 233 आणि दुसऱ्या डावात 146 धावा केल्या. तर टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 34.4 षटकांमध्ये 285 धावा कुटून काढल्या. दुसऱ्या डावात टीम इंडियाला फक्त 95 धावांचे आव्हान मिळाले होते. टीम इंडियाने 3 विकेट गमावत लक्षाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला आणि मालिका सुद्धा.

मालिका विजय साजरा केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाध साधला. तो म्हणाला की, अडीच दिवस वाया गेल्यामुळे चौथ्या दिवशी आम्हाला त्यांना झटपट बाद करायचे होते. 234 धावांवर त्यांना बाद केल्यानंतर आमच्या फलंदाजीची वेळ आली. बॅटने आम्ही काय करू शकतो ते आम्हाला बघायचे होते. या मैदानावर विजय मिळवने हा एक मजेदार अनुभव होता. ही जोखीम घेण्यासाठी आम्ही तयार होते. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची फलंदाजी करता, तेव्हा कमी धावसंख्येवर बाद होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे 100-120 धावांवर बाद होण्याची आमची तयारी होती, असे रोहित शर्मा म्हणाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हवाई सुंदरीच्या धर्तीवर एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’ हवाई सुंदरीच्या धर्तीवर एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’
विमानात जशी हवाई सुंदरी अगदी त्याच धर्तीवर आता एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ असणार आहे. शिवसेना नेते भरत गोगावले...
14 वर्ष बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या गोविंदाचं करिअर कोणत्या गोष्टीमुळे संपलं?
मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा?
सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, लग्न करण्यापूर्वी ठेवली होती ही अट
‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप, थेट सूरज चव्हाणला..
Ind Vs Ban Test Series 2024- आमची 100 धावांवर बाद होण्याची तयारी होती…; रोहित शर्मा स्पष्टचं बोलला
फडणवीसांच्या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो ताटातील चटणीसारखा, अंबादास दानवे यांचा जबरदस्त टोला