उपवर्गीकरणामागे हिंदू, दलित व्होट बँक गठित करण्याचे राजकारण, डॉ. सुरेश माने यांचा भाजपावर आरोप

उपवर्गीकरणामागे हिंदू, दलित व्होट बँक गठित करण्याचे राजकारण, डॉ. सुरेश माने यांचा भाजपावर आरोप

लोकसभा निवडणुकीत संविधानाच्या अस्तित्वाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. या मुद्दय़ानेच भाजपला 303 जागांवरून 240 जागांपर्यंत खाली खेचले. असे सांगतानाच अनुसूचित जाती, जमातींचे उपवर्गीकरण करण्यामागे नवी हिंदू दलित व्होट बँक गठित करण्याचे भाजपाचे राजकारण आहे, असा आरोप संविधान तज्ञ आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केला आहे.

डॉ. सुरेश माने हे शनिवारी मुंबईत उपवर्गीकरण या विषयावर दलित विचारवंत, कायदेतज्ञ, माजी सनदी अधिकारी, साहित्यिक, पत्रकार आणि समाजिक कार्यकर्त्यांच्या एका परिषदेत बोलत होते. अंधेरीतील चार बंगला येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रातर्फे अध्यक्ष विजय जाधव आणि सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी भवनात ही परिषद आयोजित करण्यात आली होती. देशात अनुसूचित जातींची संख्या 1108 इतकी असून अनुसूचित जातींची संख्या 628 आहे. त्यातून उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या एससी जातींची संख्या 10सुद्धा नाही. तर एसटीमधील कुठल्याही जातीने तशी मागणी केलेली नाही. असे असतानाही पेंद्र सरकारला त्या जाती-जमातींना अलग अलग करण्याची गरज का भासली आहे, असा सवालही डॉ. सुरेश माने यांनी केला. दरम्यान, परिषदेत माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, साहित्यिक अर्जुन डांगळे, माजी आयपीएस सुधाकर सुराडकर, माजी न्यायाधीश डॉ. डी.के. सोनावणे, अॅड. जयमंगल धनराज, प्रा.डॉ. एम.के. डेकाटे, प्रा.डॉ. जयराम चव्हाण, चर्मकार नेते अच्युत भोईटे, ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, दिवाकर शेजवळ, चंद्रकांत सोनावणे, प्रशांत रुपवते, अॅड. किशोर कांबळे यांनी आपले विचार मांडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप झाल्यानंतर पहिल्यांदा समोर आला रणवीर सिंग, आनंद व्यक्त करत म्हणाला… बाप झाल्यानंतर पहिल्यांदा समोर आला रणवीर सिंग, आनंद व्यक्त करत म्हणाला…
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी काही दिवसांपूर्वी गोंडस मुलीचं जगात स्वागत केलं. मुलीच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर...
‘धर्मवीर 2’मध्ये नेत्यांचा जबरदस्त लूक; तुम्हीही म्हणाल ‘एकदम सेम टू सेम’!
Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
सुपरहीट सिनेमा पाहताना चाहत्याचा अचानक मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज समोर येताच खळबळ
सोलापूर हवाई मार्गाने जोडल्याने उद्योग व्यवसायाला चालना मिळेल – नरेंद्र मोदी
शेतात पडलेल्या तारेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, सांगलीतील म्हैसाळ येथील घटना
सातारा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट बनतेय!