शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर सशस्त्र हल्ला, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर सशस्त्र हल्ला, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मिंधे सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून दिवसाढवळ्या सशस्त्र हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचे पुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर सशस्त्र हल्ला झाल्याची घटना आज सिव्हिल लाईन भागात घडली. पृथ्वी यांनी स्वतःचा बचाव केल्याने पुढील अनर्थ टळला. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱया नेकलेस मार्गावर पृथ्वी देशमुख मित्रासह एका दुकानात उभे होते.

हल्लेखोर सराईत गुन्हेगार असून त्यांनी पृथ्वी यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाले. तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलीस  ठाण्यात पोहोचले. मात्र यावेळी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गुन्हेगारी वाढली

माझ्या मुलावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्याने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. या भागात वारंवार गुन्हेगारी कृत्ये  घडत असून ही बाब वारंवार पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. आज पोलीस ठाण्यात आलो तर तीनच पोलीस हजर… याकडे लक्ष वेधत पोलिसांनी कारवाई केली नाही तर गुंडांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा नितीन देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांकडून भिडेच्या लेकीला धमक्या; अभिनेत्रीला सेटवरच पॅनिक अटॅक ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांकडून भिडेच्या लेकीला धमक्या; अभिनेत्रीला सेटवरच पॅनिक अटॅक
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेत सोनू भिडेची...
‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीच्या पतीने सांगितला भीषण अपघाताचा तो अनुभव; कसे वाचले प्राण?
Arbaaz Khan: ‘प्रथा आणि परंपरा…’, कोणता धर्म मानतो अरबाज खान?
ग्रँड फिनालेपूर्वी ‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातून पंढरीनाथ कांबळे बाहेर
Khatron Ke Khiladi 14 चा विजेता ठरला करणवीर, ट्रॉफीसह मिळाली मोठी रक्कम आणि आलिशान कार
चिंता मिटली! सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार; SpaceX Crew-9 ची ISS वर यशस्वी भरारी
Madhya Pradesh रुग्णालयातील एसी पडले बंद, रुग्णांना स्वत:चे पंखे सोबत घेऊन यावे लागतात