हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही

हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही

शुक्रवारी (27 सप्टेंबर) इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा मृतदेह अखेर  सापडला आहे. सुरक्षा आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळावरूनच मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र भीषण बॉम्ब हल्ल्यात खात्मा झालेल्या नसरल्लाहच्या मृतदेहावर एकही जखम नाही.  त्यामुळे त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहच्या चीफचा मृतदेह सापडला आहे. दोन सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की, हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला आहे. एका वैद्यकीय आणि सिक्युरिटीच्या सुत्रांकडून सांगितले की, बेरूतच्या दक्षिणी उपनगरात इस्रायली हवाई हल्ल्याच्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला आहे.

हसन नसरल्लाहच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसून मोठा स्फोट झाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.  नसरल्लाहचा मृत्यू बॉम्बच्या प्रचंड आवाजामुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण हल्ल्यात नसरल्लाह याच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे झाले असून, फक्त त्याची अंगठी सापडल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र आता त्याचा मृतदेह अखंड सापडला आहे.

दुसरीकडे, इस्रायलने सांगितले की, हिजबुल्लाच्या तळांवर हल्ले सुरूच आहेत. एका नवीन अपडेटमध्ये, इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी गेल्या काही तासांत लेबनॉनमधील अनेक हिजबुल्लाह तळांवर हल्ला केला आहे. लष्कराच्या म्हमण्यानुसार, हिजबुल्लाहचे रॉकेट लाँचर आणि शस्त्रास्त्रांची गोदामे उद्ध्वस्त करणे हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचे म्हणणे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

योजनांचा पाऊस, वित्तविभागाला घाम?, वाचा ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट! योजनांचा पाऊस, वित्तविभागाला घाम?, वाचा ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट!
‘दैनिक इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीनुसार, वित्त विभागानं सरकारच्या तिजोरीबद्दलच चिंता व्यक्त करत सरकारी योजनांवर बोट ठेवलं आहे. राज्यात संकुलं बांधकामासाठी क्रीडा...
भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल
लोकांची हसती-खेळती घरं उद्ध्वस्त केली; भाजपच्या ‘बुलडोझर राजवर’ अखिलेश यादव यांचा हल्लाबोल
हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही
Photo – सईचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवर चाहते फिदा
दिवाळीपूर्वी BCCI चे खेळाडूंना गिफ्ट; बंगळुरूमध्ये National Cricket Acadamy चे उद्घाटन, नावातही केला बदलं
Ratnagiri News – वर्दळीच्या हर्णे मार्गावर खड्डयांचे साम्राज्य; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष