Yavatmal News – महिला कर्मचाऱ्याला मानसिक, शारीरिक त्रास देणारे अद्याप मोकाट; विशाखा समितीच्या कारभारावरच प्रश्चचिन्ह

Yavatmal News – महिला कर्मचाऱ्याला मानसिक, शारीरिक त्रास देणारे अद्याप मोकाट; विशाखा समितीच्या कारभारावरच प्रश्चचिन्ह

>>प्रसाद नायगावकर

दिवसागणिक महिला अत्याचारांच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मिंधे सरकार ‘लाडकी बहीण’ सारख्या फसव्या योजना आणत आहेत. पण याच लाडक्या बहिणी सुरक्षित नसतील तर अशा योजनांचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरी ग्रामिण रुग्णालयातीलच सहाय्यक अधिक्षक व अन्य दोघांनी एका कंत्राटी महिला आरोग्य कर्मचाऱ्याला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांना करण्यात आली. त्यावरून 19 जूनला ग्रामीण रुग्णालय येथे विशाखा समितीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल तीन महिने होऊनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही. यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील झरी जामणी ग्रामिण रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक सुभाष राठोड, लिपीक सुनील पाटील यांनी कंत्राटी प्रयोगशाळेतील सहाय्यक महिला यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरुवात केले. सततच्या त्रासामुळे अखेर महिला परिचारिकेने सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेकडे केली. 13 जून रोजी कर्मचारी संघटनेने निवेदनातून याची तक्रार संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली. या तक्रारीवरून यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयातील राठोड यांनी संघटनेच्या तक्रारीवरून 20 जून 2024 रोजी झरी जामणी येथील ग्रामीण रुग्णालय येथे विशाखा समितीकडून चौकशी करण्यात आली.

सदर समिती तीन महिन्यांपूर्वी चौकशी करून निघून गेली. परंतु मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागाकडून आजतागयात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागाकडून पाठराखण होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदरहू आरोपी हा स्वतःला यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांचा निकटवर्ती असल्याचे सांगतो. त्यामुळेच कुठे तरी प्रशासनावर दबाव आहे. यामुळेच या दोषींवर कारवाई होत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संघटनेच्या तक्रारीवरून चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो अहवाल 20 दिवसांपूर्वी उपसंचालक आरोग्य सेवा यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. उपसंचालकांच्या निर्देशनुसार समोरील कारवाई करण्यात येईल, असे डॉक्टर सुखदेव राठोड (जिल्हा शल्य चिकित्सक, यवतमाळ) म्हणाले. 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल
जनता ही वाघनखं आहेत आणि ही वाघनखं तुमच्या राजकारणाचा कोथळा बाहेर काढणार असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव...
लोकांची हसती-खेळती घरं उद्ध्वस्त केली; भाजपच्या ‘बुलडोझर राजवर’ अखिलेश यादव यांचा हल्लाबोल
हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही
Photo – सईचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवर चाहते फिदा
दिवाळीपूर्वी BCCI चे खेळाडूंना गिफ्ट; बंगळुरूमध्ये National Cricket Acadamy चे उद्घाटन, नावातही केला बदलं
Ratnagiri News – वर्दळीच्या हर्णे मार्गावर खड्डयांचे साम्राज्य; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले…