सोशल मीडियावर मुलींच्या नावे खोटे अकाऊंट बनवायचे, मग ब्लॅकमेल करून लुटायचे

सोशल मीडियावर मुलींच्या नावे खोटे अकाऊंट बनवायचे, मग ब्लॅकमेल करून लुटायचे

सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर गुन्हेगारी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डॉक्टर, वकील आणि पोलिसही या सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. सोशल मीडियावर मुलींच्या नावने खोट अकाऊंट बनवत तिघांनी अनेक जणांना गंडा घातला आहे.

उत्तर प्रदेशातील ललितपुर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बृजेंद्र, नीलेश रजक आणि अंकित रजक अशी आरोपींची नावे आहेत. हे तीघे मुलींच्या नावाने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर खोटी आयडी बनवून मुलांना आपल्या जाळ्यात अडकवत होते. तसेच त्यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना अश्लील व्हिडीओ पाठवून त्याचे ते रिकॉर्डींग करत होते. त्यानंतर पोलीस असल्याचे सांगत ते लोकांना ब्लॅकमेल करत होते.

पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून 37 हजार रुपये, 7 अ‍ॅड्रॉइड मोबाईल, 13 सीमकार्ड आणि 5 ATM कार्ड सह इतर अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत. सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कठुआमध्ये आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा, राजौरीतही चकमक सुरू कठुआमध्ये आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा, राजौरीतही चकमक सुरू
कठुआ जिह्यातील कोग मांडली दुर्गम गावात सुरू असलेल्या चकमकीत दुसऱया दिवशी रविवारी आणखी एका दहशतवाद्याला टिपण्यात आल्यामुळे या चकमकीत आतापर्यंत...
मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या
लाल मंगळावर मानव होईल हिरवा
‘प्रोडक्ट शोकेस’ने शिकवले नवीन तंत्रज्ञान
सोशल मीडियावर मुलींच्या नावे खोटे अकाऊंट बनवायचे, मग ब्लॅकमेल करून लुटायचे
योजनांचा पाऊस, वित्तविभागाला घाम?, वाचा ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट!
भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल