शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपचा आक्षेप

शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपचा आक्षेप

महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. प्रत्येक पक्षाचे नेते आणि संभाव्य उमेदवार हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखत आहेत. या रणनीतीचा भाग म्हणून कुणी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत, कुणी वेगवेगळ्या आश्वासनं देत आहेत, तर कुणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मदत करत आहेत. मुंबईच्या भायखळ्यात शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा बॅनरही चर्चेचा कारण ठरला होता. या कार्यक्रमावर भाजपने आक्षेप घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील भायखळामध्ये यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप करण्यात आलं. यामिनी जाधव यांना लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून भायखळातून उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांच्याकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पण यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. अशा पद्धतीने बुरखा वाटपावर भाजप सहमत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

“आम्हाला हे मान्य नाही. मला या विषयी पूर्ण माहिती नाही तरीपण अशा पद्धतीच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाशी भाजप सहमत नाही. त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या मतदारसंघाची आवश्यकता यावर त्यांनी मत प्रदर्शित करावं. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं हे मान्य नाही”, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली.

किशोरी पेडणेकर यांचा निशाणा

यामिनी जाधव यांनी आयोजित केलेल्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभेला 46 हजारांचा फटका बसल्यावर कळालं, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला. “सोयीनुसार आपल्या भूमिका बदलत आहेत, ज्यावेळेला लोकसभेला फटला बसला, 46 हजार मतांनी मागे पडल्यानंतर समजलं. यामिनी जाधव यांनी इथून फुटतानादेखील सांगितलं होतं की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. ठाकरे गट हिंदुत्वला न मानणाऱ्या लोकांबरोबर गेले. फक्त चांगले शब्द वापरायचे, त्याला चांगल्या शब्दांता मुलामा द्यायचा आणि अर्थ बदलायचा. भूमिका बदलली ते लोकांना कळतंय. लोकांनी लोकसभेत बरोबर दाखवून दिलं आहे”, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब (एमजेएससी) व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सीफेस म्युनिसिपल शाळेचा रेहान शेख विजेता...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार
Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
Latur News – मराठा आरक्षणासाठी पती-पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज