एक दिवस आधीच वडिलांना भेटली अन् आज… वडिलांच्या टोकाच्या निर्णयाने मलायका हादरली; काय घडलं होतं?

एक दिवस आधीच वडिलांना भेटली अन् आज… वडिलांच्या टोकाच्या निर्णयाने मलायका हादरली; काय घडलं होतं?

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. मलायका अरोराची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मलायका ही सतत विदेशात जाताना दिसत आहे. आता मलायका अरोरा हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोरा हिच्या वडिलांनी राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ज्यावेळी मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केला, त्यावेळी घरात तिची फक्त आईच होती. हैराण करणारे म्हणजे एक दिवस अगोदरच मलायका अरोरा ही तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली होती.

मलायका अरोरा ही अकरा वर्षांची असतानाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. मात्र, त्यानंतर तब्बल 39 वर्षांनंतर तिच्या आई वडिलांनी एकत्र राहण्यास सुरूवात केली. मलायकाच्या आई वडिलांनी बांद्रामध्ये एकत्र घर घेतले आणि तिथेच दोघे राहत होते. मात्र, अचानक मलायकाच्या वडिलांनी इतके मोठे पाऊल उचलले.

मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. मलायका अरोरा हिने तिच्या मुलाखतीमध्ये तिच्या आई वडिलांच्या घटस्फोटाबद्दल मोठे भाष्य केले. मलायका अरोरा ही म्हणाली की, मी अकरा वर्षांची असतानाच माझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटचा खूप वेगळा परिणाम माझ्यावर झाला.

पुढे मलायका अरोरा म्हणाली की, माझ्या आईनेच आमचा सांभाळ केला. माझ्या आई वडिलांच्या घटस्फोटानंतर मी खूप जास्त मजबूत बनले. मी जवळून बघितले आहे की, एखाद्या महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर तिला काय काय गोष्टींना सामोरे जावे लागते, मलायका हिने पहिल्यांदाच तिच्या आई वडिलांच्या नात्यावर भाष्य केले होते.

मलायका अरोरा आणि तिची बहीण दोघीजणी आई वडिलांची भेट घेण्यासाठी कालच त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. मलायका ही आई वडिलांच्या घरी कायमच जात. कालच मलायका ही भेटीला गेली आणि आज तिच्या वडिलांनी आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलले. ज्यावेळी मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केली, त्यावेळी मलायका ही पुण्यात होती. वडिलांच्या आत्महत्येबद्दल कळताच तिने बांद्रा गाठला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी खलबतं सुरू आहेत. महायुतीत तर या पदावरून रस्सीखेच...
परिणीती चोप्रा हिने शेअर केला राघव चड्ढा याच्यासोबतचा ‘तो’ खास व्हिडीओ, अभिनेत्रीने पोस्टमध्ये थेट…
चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थानला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
दर्शनाला चाललेल्या कुटुंबाच्या रिक्षाला ट्रकची धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री व्हायचंय, पण गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच अडकते, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
अंत्यसंस्काराठी स्मशानात तिरडी घेऊन जाताना ग्रामपंचायतीचा निषेध, वाढवणा खुर्द येथील घटना
भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला – विजय वडेट्टीवार