निक्की आणि वर्षा उसगांवकर पुन्हा भिडल्या; ‘या’ मुद्द्यावरून वाद

निक्की आणि वर्षा उसगांवकर पुन्हा भिडल्या; ‘या’ मुद्द्यावरून वाद

‘बिग बॉस मराठी’ चं घर आणि वाद यांचं एक वेगळं नातं आहे. या सिझनमध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर या दोघी भिडताना दिसतात. पहिल्याच दिवशी या दोघींमध्येस कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर अनेकदा त्यांचे खटके उडाले आहेत. आताही या दोघींमध्ये जोरदार भांडण झालं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये निक्की आणि वर्षा उसगांवकरमध्ये भाजीवरुन भांड्याला भांड लागलेलं पाहायला मिळत आहे. निक्की म्हणतेय,”इथे लोकांना या घरात लोकांना अन्न मिळत नाही आणि यांनी सरळ भाजी फेकली आहे”. त्यावर वर्षा उसगांवकर उत्तर देतात. कारण मला ती खराब वाटली, असं वर्षा म्हणतात.पुढे दोघांची तू-तू, मैं-मैं पाहणं मात्र रंजक ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या सीझनचा आता सातवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घन:श्याम दरवडे घराबाहेर गेला. तर या आठवड्यातही एका सदस्याचा घरातील प्रवास संपणार आहे. त्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्य पार पडलं. या आठवड्यात सूरज घराचा कॅप्टन असल्याने तो सेफ आहे.

‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’चा सध्या सातवा आठवडा सुरू आहे. सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला आहे. सातव्या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि आर्या जाधव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

‘वर्षा उसगांवकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने बिग बॉस मराठी’च्या घरात चर्चेत असतात. आजही घरातील सदस्य त्यांच्याबद्दल बोलताना दिसणार आहेत. अंकिता, पॅडी आणि सूरज गार्डन एरियामध्ये वर्षा ताईंबद्दल बोलताना दिसत आहेत. जी गोष्ट आपल्याला जमत नाही.. त्यातून लांब व्हा, असं अंकिता म्हणते. तर पॅडी म्हणतो, सॉरी बोलून विषय संपवायला हवा. एका लेव्हलनंतर वर्षा ताईंवर आपण आवाज वाढवू शकत नाही, असं पॅडीने म्हटलं. एकंदरीतच वर्षा यांनी भाजी फेकलेली घरातील कोणत्याच सदस्याला आवडलेलं दिसत नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील आरटीओच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका, वाहनविषयक कामे रखडली राज्यातील आरटीओच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका, वाहनविषयक कामे रखडली
राज्यातील आरटीओंनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल 24 सप्टेंबरपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे.त्यामुळे राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांचे कामकाज ठप्प झालेले...
लहानपणापासूनच आलिया भट्ट हिला ‘हा’ गंभीर आजार, अभिनेत्रीने म्हटले लग्नात…
एअरपोर्टवर क्लासी लूकमध्ये रेखा, अभिनेत्रीचा ‘तो’ लूक पाहताच…
आपल्या किडनीची योग्य देशभाल कशी कराल? एक्सपर्ट डॉ. राहुल गुप्ता काय सांगतात?
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला
परिणीती चोप्रा हिने शेअर केला राघव चड्ढा याच्यासोबतचा ‘तो’ खास व्हिडीओ, अभिनेत्रीने पोस्टमध्ये थेट…
चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थानला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल