जगभरातून महत्त्वाच्या बातम्या…

जगभरातून महत्त्वाच्या बातम्या…

अपुरी झोप विकेंडला घेणे फायदेशीर

बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला हृदयविकाराचा धोका निर्माण झाला आहे. 35 ते 45 या वयोगटातील व्यक्तींनाही हार्ट अटॅक येऊ लागले आहेत. हार्ट अटॅक येण्याला अपुरी झोप हे एक कारण ठरत आहे. लोक मध्यरात्रीपर्यंत विनाकारण जागरण करत आहेत. परंतु आठवडय़ाभरातील अपुरी झोप विकेंडच्या दिवशी घेतल्याने हृदयविकाराचा धोका 20 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. चीनमधील स्टेट की लॅबोरेटरी ऑफ इन्फेक्शियस डिसीजने केलेल्या 14 वर्षांच्या संपूर्ण अभ्यासानुसार, आठवडय़ाच्या शेवटच्या दिवसात जास्त तास झोपल्याने तुमच्या शरीराला झालेल्या झोपेच्या कमतरतेची भरपाई होऊ शकते, असे संशोधकांना आढळून आले आहे.

हार्ट ऍटॅक येण्यापूर्वी एआय देणार अलर्ट

एआय क्रांतीमुळे वैद्यकीय तपासण्या आणि उपचार एकदम सुलभ होऊ लागले आहेत. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच एआय या संबंधीची माहिती देणार आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच्या लक्षणाबद्दल अलर्ट करेल, असे एआय मॉडेल कोरियातील एका रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बनवलेय. हे मॉडेल रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या चार सामान्य तपासण्यांद्वारे हार्ट अटॅक येण्याआधी अर्धा तास अलर्ट देईल. 74 टक्के प्रकरणांत हार्ट अटॅकचा धोका अर्धा तास आधी समजलाय, तर अन्य प्रकरणांत एआय मॉडेलने 14 तास आधी धोका दाखवून दिलाय.

ब्रिटनच्या राजकुमारीवरील कीमोथेरेपी पूर्ण

ब्रिटनमधील वेल्सची राजकुमारी केट मिडलटन यांच्यावर सुरू असलेल्या कॅन्सरच्या उपचारासंबंधी अपडेट आले आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ समोर आला असून यात त्यांनी म्हटले की, कीमोथेरेपी उपचार पूर्ण झाला आहे. आता त्या कॅन्सरमूक्त राहण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. मार्च महिन्यात त्यांना कॅन्सर आजाराचे निदान झाले होते.

मॅगी नूडल्समध्ये आढळले जिवंत किडे

जबलपूरमधील एका किराणा दुकानातून विकत घेतलेल्या मॅगी नूडल्समध्ये जिवंत किडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नूडल्सची पॅकेजिंग तारीख मे 2024, तर एक्सपायरी तारीख जानेवारी 2025 लिहिलेली होती. एक्सपायरी व्हायला वेळ असतानाही मॅगीमध्ये किडे आढळल्यानंतर ग्राहकाने राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे तक्रार केली आहे.

नोकरी! रेल्वेत 11577 पदांवर बंपर भरती

रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. रेल्वे विभागाकडून 11588 पदांसाठी भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर आहे. मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टरसह वेगवेगळय़ा पदांसाठी भरती आहे.

77 हजार कोटींची वाहने विक्रीविना पडून

देशात गाडय़ांचे उत्पादन वाढल्याने आणि ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने देशात 77 हजार कोटी रुपयांची वाहने डिलर्सकडे विक्रीविना पडून आहेत. इतक्या मोठय़ा किमतीची वाहने पडून असल्याने फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने चिंता व्यक्त केली. ऑगस्टमध्ये विक्रीविना पडलेल्या वाहनांची किंमत 77,800 कोटी झाली आहे.

चायनीज मालाने जगाचा बाजार उठवला

चायनीज मालाची कोणतीच गॅरेंटी नाही, पण तरीही चिनी मालामुळे केवळ हिंदुस्थानच नव्हे तर अख्खे जग हैराण आहे. आता तर दक्षिणपूर्व आशियातील देशही चिनी मालाविरोधात आवाज उठवू लागले आहेत. कारण चीनमधून येणाऱया स्वस्त मालामुळे स्थानिक बाजार थंडावले आहेत. स्थानिक उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारी वाढली आहे. उदाहरण द्यायचे तर, थायलँडच्या उत्तर लॅमपँग प्रांतात सिरॅमिक्सच्या निम्म्या फॅक्टरी बंद झाल्या आहेत. इंडोनेशियात हजारो टेक्सटाईल कामगारांच्या नोकऱया गेल्या आहेत. मलेशियात चिनी मालामुळे छोटे दुकानदार हवालदिल आहेत. मागील दोन दशकांपासून चीन जगाची फॅक्टरी बनलाय. चीन s मोठय़ा प्रमाणात उत्पादन करून जगभरातल्या मार्केटमध्ये स्वस्त माल खपवत आहे. त्यामुळे अनेकांच्या धंद्याला झळ बसलीय.

युक्रेनच्या हल्ल्याने मॉस्को हादरले

गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धातील सर्वात भीषण हल्ला काल झाला. युक्रेनने मॉस्कोवर ड्रोन हल्ले केले. युक्रेनच्या 140 पेक्षा अधिक ड्रोन्सने रात्रभर मॉस्कोसह अनेक शहरांवर हल्ला केला. मॉस्कोजवळील रामेन्स्कोहे शहरात ड्रोनमुळे दोन बहुमजली इमारती कोसळल्या. हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले. युक्रेनने केलेल्या हल्ल्यानंतर मॉस्को परिसरातील तीन विमानतळे तात्पुरती बंद करण्यात आली. तब्बल 48 विमाने दुसऱया विमानतळावर पाठवण्यात आली. तर 30 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही – हायकोर्टचा इशारा Akshay Shinde Encounter : चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही – हायकोर्टचा इशारा
बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र या एन्काऊंटरवर...
Akshay Shinde Encounter : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या?; कोर्टात वकिलाचा मोठा युक्तिवाद काय?
Akshay Shinde Encounter: हे एन्काऊंटर होऊच शकत नाही, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
Akshay Shinde Encounter Hearing : तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारी वकिलांना घेतलं फैलावर
कधी कधी काही शिक्षा वेगळ्या पद्धतीने होतात…पंकजा मुंडेंनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रथमच केले भाष्य
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरआधी अक्षयने आईवडिलांकडे 500 रुपये मागितले, देहबोली कशी होती? बोलणं काय झालं?; वकिलाचा मोठा युक्तिवाद काय?
Sharmila Thackeray : अक्षय शिंदे कोणी संत नाही, असे एन्काऊंटर झाले पाहिजेत, शर्मिला ठाकरेंची रोखठोक भूमिका