बावनकुळेंच्या कुलदीपकाला वाचविण्यासाठी ‘लाडका मुलगा’ योजना, संकेत गाडीतच होता पण ना ब्लड टेस्ट ना एफआयआरमध्ये नाव

बावनकुळेंच्या कुलदीपकाला वाचविण्यासाठी ‘लाडका मुलगा’ योजना,  संकेत गाडीतच होता पण ना ब्लड टेस्ट ना एफआयआरमध्ये नाव

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याला नागपूरमधील ऑडी अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी मिंधे सरकारकडून ‘लाडका मुलगा’ योजना राबवली जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेतबाबत सॉफ्ट का@र्नर ठेवण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आणला आहे. पोलिसांचे हात आणि पायही त्यांनी बांधून टाकले आहेत. म्हणूनच की काय संकेतची ना ब्लड टेस्ट केली गेली ना एफआयआरमध्ये त्याच्या नावाची नोंद केली गेली. अपघातावेळी संकेत गाडीतच होता, अशी माहिती आज पोलीस उपायुक्तांनीही दिली. मग गुन्हा नोंदवताना त्याचे नाव का वगळले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नागपूरच्या धरमपेठ भागात रविवारी रात्री हा प्रकार घडला होता. नागपूर शहर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी आज यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली. अपघातावेळी संकेत बावनकुळे गाडीमध्ये होता, असे त्यांनी सांगितले. ऑडीमधील संकेतचे मित्र अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार यांना ताब्यात घेण्यात आले, परंतु ऑडी कार संकेतच्या नावावर असूनही संकेतवर काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

संकेत घटनास्थळी सापडला नाही

पोलीस उपायुक्त मदने यांनी माहिती देताना सांगितले की, संकेत गाडी चालवत नव्हता. अर्जुन हावरे गाडी चालवत होता. त्याच्या बाजूच्या सीटवर संकेत बावनकुळे हा बसला होता, तर रोनित चित्तमवार हा मागच्या सीटवर बसला होता. हे तिघेही एका हॉटेलमध्ये जेवल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले होते. वाटेत हा अपघात घडला. या घटनेनंतर संकेत बावनकुळे हा घटनास्थळी आढळून आला नाही, असेही मदने यांनी सांगितले. त्यावरून संकेत हा घटनास्थळावरून पळून गेल्याचे सिद्ध झाले आहे.

फक्त ड्रायव्हर अर्जुनवर गुन्हा दाखल

या घटनेवेळी गाडीचा वेग ताशी 150 किलोमीटर होता असे सांगितले जाते. मात्र पोलिसांनी गाडीचा वेग किती होता याची कल्पना नाही असे सांगितले. आरटीओ आणि ऑडी तज्ञांना बोलवून याचा तपास करू, असे उपायुक्त मदने म्हणाले. याप्रकरणी फक्त अर्जुनवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोनित किंवा संकेत या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

बावनकुळेंच्या ‘लाडक्या’ मुलावर महायुती सरकारने कारवाई करावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर येथील हिट अँड रन प्रकरणाची सरकारने चौकशी करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ‘लाडका’ मुलगा संकेत बावनकुळेवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. राज्यातील हिट अँड रन प्रकरणात सरकार कशा प्रकारे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे याची उदाहरणे देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. वरळी येथील अशाच प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. आता तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत. नंबर प्लेट काढून, सीसीटीव्ही नष्ट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

संकेतची कबुली पण पलायनाबाबत मौन

अपघातावेळी आपण ऑडी कारमध्ये होतो अशी कबुली संकेत बावनकुळेने दिली असल्याचे उपायुक्त मदने यांनी सांगितले. मात्र संकेतने अपघातस्थळावरून पलायन का केले आणि त्याचवेळी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात का घेण्यात आले नाही याबाबत पोलिसांनी काहीच स्पष्ट केले नाही.

संकेतच्या मित्रांच्या रक्तात अल्कोहोल सापडले

ऑडी चालवणाऱया अर्जुन हावरेने नशा केलेली होती. डॉक्टरने याबद्दल पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. त्याचे ब्लड सॅम्पलही पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर अर्जुन आणि रोनित या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे. त्या दोघांचेही ब्लड सॅम्पल तपासासाठी पाठवले आहे, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

हाच तो संकेत

संकेत अपघातस्थळावरून पळाल्यानंतर त्याला मित्रांनी घरी सोडले. अर्जुन व रोनितला पोलिसांनी ताब्यात घेतले, पण संकेतला सोडले गेले. संकेतला मित्रांनी घरी सोडले. त्यानंतर कार सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आली. त्यावेळी आरटीओलाही पोलिसांनी कळवून कारबाबत माहिती घेतली नाही. सोमवारी रात्री त्याला चौकशीला बोलवले गेले तेव्हाही व्हीव्हीआयपी वागणूक दिली गेली.

संकेतवर एफआयआर कधी दाखल होणार?

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांना अनेक सवाल विचारले आहेत. या प्रकरणाच्या तपासात व एफआयआर लिहिण्यामध्ये हयगय करणारे पोलीस, तपासणी न करणारा आरटीओ आणि गाडी ज्याच्या नावावर आहे, जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे यांच्यावर एफआयआर कधी दाखल होणार? संकेतवर कोणता गुन्हा दाखल होणार? आणि यात कोणताही दबाव येणार नाही याची हमी बावनकुळे देतील का? असे अंधारे यांनी म्हटले आहे.

– चौकशी निष्पक्ष व्हावी असे बावनकुळेंना वाटत होते, मग एफआयआरमध्ये गाडीचा नंबर का आला नाही?
– ज्या ऑडीने ठोकले आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्रे पोलिसात का जमा झाली नाहीत?
– एफआयआरमध्ये संकेत बावनकुळेचे नाव का आले नाही?
– या गाडीची कोणतीही तपासणी न करता आरटीओने रिपेअरिंगसाठी परत कशीकाय पाठवली?
– आरटीओ आणि पोलिसांवर कुणाचा दबाव होता?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अक्षयने आधी शिवी दिली, मग हवालदार तावडेंच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या…एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी सांगितले नेमके काय घडले? अक्षयने आधी शिवी दिली, मग हवालदार तावडेंच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या…एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी सांगितले नेमके काय घडले?
बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर सोमवारी करण्यात आले. त्यानंतर राज्यात सत्ताधारी अन् विरोधक समोरासमोर आले...
रॅम्प वॉकदरम्यान ऐश्वर्या रायसोबत घडलं असं काही..; अभिनेत्रीच्या आत्मविश्वासाचं होतंय कौतुक
हिंमतसुद्धा करू नका..; तिरुपती लड्डू वादाची खिल्ली उडवणाऱ्या अभिनेत्यावर भडकले पवन कल्याण
वीज कर्मचारी आज, उद्या संपावर जाणार
परतीच्या पावसाने नगर जिल्हय़ाला झोडपले! नगर, पारनेर, राहुरी तालुक्यांत पाऊस; सरासरी 129 मि.मी. पावसाची नोंद
सहकारी संस्था संपवण्याचे घातक राजकारण खेळले जात आहे, शरद पवार यांची टीका
पश्चिम रेल्वेत 5066 शिकाऊ पदांसाठी भरती