ऐन निवडणुकीत भाजपची किरीट सोमय्यांवर मोठी जबाबदारी, मोहीम फत्ते करणार?; आघाडीला ताप होणार?

ऐन निवडणुकीत भाजपची किरीट सोमय्यांवर मोठी जबाबदारी, मोहीम फत्ते करणार?; आघाडीला ताप होणार?

भ्रष्ट कारभाराची यादी वाचून दाखवत विरोधी पक्षातील नेत्यांना घाम फोडणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. असं असतानाच भाजपने किरीट सोमय्या यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपने ‘विधानसभा निवडणूक संपर्क प्रमुख’पदी किरीट सोमय्या यांची निवड केली आहे. त्यांची ही निवड करत भाजपने विरोधी पक्षांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

किरीट सोमय्यांवर मोठी जबाबदारी

किरीट सोमय्या यांनी मध्यंतरी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप केले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवर सोमय्यांनी आरोप केले होते. त्यातीलच काही नेते हे सध्या महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर किरीट सोमय्या यांच्यावर पक्षाने ‘निवडणूक संपर्क प्रमुख’ पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सोमय्या अॅक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या अॅक्टिव्ह झाल्यानंतर विरोधी पक्षातील कोणत्या नेत्यांच्या ‘फाईल्स’ समोर आणणार हे पाहणं महत्वाचं असेल.

व्यवस्थापन समितीत कोण- कोण?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षते खाली समिती जाहीर करण्यात आली आहे. किरीट सोमय्या याना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे. ‘निवडणूक संपर्क प्रमुख’ म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागला आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा निश्चय आहे. मागच्यावेळी जिंकलेल्या 105 जागांपेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 125 जागा जिंकण्याचा भाजपने संकल्प केला आहे. 50 जागा आपण जिंकू शकतो, असा विश्वास भाजपला आहे. तर उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर आहे. भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पोलिसांच्या व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, पाहा Video Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पोलिसांच्या व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, पाहा Video
बदलापूरच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सरकार पुरस्कृत दहशतवाद म्हटलंय. आधी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नेमका...
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला वेगळं वळण, हायकोर्टाने घेतली दखल
मुनव्वर फारुकी याने मुंबईत खरेदी केले नवीन घर, किंमत तब्बल इतके कोटी आणि…
Ind Vs Ban 2nd Test 2024 – BCCI चा मोठा निर्णय, टीम इंडियाचे हे 3 खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळणार नाहीत
अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर, 7 तास शवविच्छेदन; अहवालामध्ये मोठा खुलासा काय?
चोर समजून दोन अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
Video – पेन्शनसाठी 70 वर्षीय वृध्द महिलेची पायपीट, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ व्हायरल