निकृष्ट कामे करणाऱ्या 11 ठेकेदारांना पालिकेचा दणका

निकृष्ट कामे करणाऱ्या 11 ठेकेदारांना पालिकेचा दणका

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाची कामे घेण्यासाठी तब्बल 40 ते 45 टक्के कमी दराने निविदा भरून निकृष्ट कामे करणाऱ्या ११ ठेकेदारांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी चांगलाच दणका दिला आहे. 11 ठेकेदारांना एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले असून, निकृष्ट झालेल्या कामाचे दुप्पट पैसे वसूल करण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या ठेकेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शहरात महापालिकेच्या वतीने विविध विकासकामे केली जातात. मात्र, स्थापत्य विभागातील रस्ते दुरुस्ती, पेव्हींग ब्लॉक, मातीचे जॉगिंग ट्रॅक यासारखी कामे घेताना 11 ठेकेदारांनी 14 विकासकामांत तब्बल 40 ते 45 टक्के कमी दराने निविदा भरल्या होत्या. मात्र,एवढ्या कमी दरात कामे घेतल्यानंतर त्याचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहील का? याची आयुक्त सिंह यांना खात्री नव्हती. त्यामुळे सिंह यांनी अशा 11 कंत्राटदारांच्या 14 कामांचा दर्जा तपासण्याचे आदेश महापालिका दक्षता विभागाला सप्टेंबर 2022 मध्ये दिले होते.

ठेकेदारांमध्ये एकच खळबळ

दक्षता विभागाने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (सीओईपी) कडून कामांच्या दर्जाची तपासणी करून घेतली. सीओईपीने केलेल्या तपासणीत पेंव्हीग ब्लॉकच्या कामात ब्लॉक खचलेले, ज्याठिकाणी दुरुस्ती आवश्यक अशा ठिकाणी दुरुस्तीच केली नाही, महापालिका मानांकनानुसार काम नाही, रस्ते दुरुस्ती केल्यानंतर त्वरित खड्डे पडणे, काँक्रीट थराची जाडी कमी असणे, जॉगिंग ट्रॅकवर कमी माती टाकणे,निविदेनुसार काम न करणे अशा विविध धक्कादायक बाबी समोर आल्या. या तपासणीचा अहवाल काही महिन्यांपूर्वी आयुक्तांना सादर करण्यात आला होता.

या अहवालानंतर महापालिकेने निकृष्ट कामे करणाऱ्या 11 ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा सादर करण्याचा आदेश दिला होता. मात्र, करण्याचा मात्र, नाही. यानंतर आयुक्त सिंह यांनी सर्व ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर अभियंता मकरंद निकम यांनी 11 ठेकेदारांना एका वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याचा आदेश काढला आहे. तसेच ठेकेदारांकडून निकृष्ट झालेल्या कामाचा दुप्पट खर्च वसूल करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका ठेकेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हे ठेकेदार एक वर्षासाठी काळ्या यादीत

अजय घनश्याम खेमचंदानी, अनिकेत एंटरप्रायजेस, चैताली सप्लायर्स, कविता एंटरप्रायजेस, काव्या असोसिएट्स, मोटवानी अॅण्ड सन्स, नामदे एंटरप्रायजेस, आर. जी. मंगळवेढेकर, रामचंद्र एंटरप्रायजेस, सनसारा कन्स्ट्रक्शन, सोहम एंटरप्रायजेस या 11 ठेकेदारांना एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे या ठेकेदारांना महापालिकेच्या कोणत्याही निविदे प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही.

11 ठेकेदरांना शहरातील विविध भागातील स्थापत्यविषयक 14 कामे देण्यात आली होती. यामध्ये ठेकेदारांना निकृष्ट काम केल्याबद्दल एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच निकृष्ट कामाचे दुप्पट पैसेही वसूल केले जाणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर
या आठवड्यात प्रिया बापटने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. अलीकडेच तिची सिरिज ‘रात जवान है’ चा...
ना हिंदू ना मुस्लिम, सबा आझाद हिच्याकडून धर्माबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, माझे…
विठुरायाच्या टोकन दर्शनाचा मार्ग मोकळा; तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन रांगेची अद्यावत व्यवस्था
बदलापूर प्रकरणातील आरोपीचे कोणीही समर्थन केले नाही, स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न : नाना पटोले
योजनेच्या नावाखाली ग्रामस्थांचे फोटो घेतले, भाजपने आंदोलनाच्या बॅनरवर चिकटवले
Photo – गुलाबी रंगाच्या काश्मीरी सूटमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अंदाज
Mollywood Me Too – अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, अभिनेते सिद्धीकींविरोधात अरेस्ट वॉरंट जारी