IC 814 Hijacked : त्या एका बिझनेसमनच्या सुटकेसाठी 70 देश करत होते प्रार्थना, कोण होता तो?

IC 814 Hijacked : त्या एका बिझनेसमनच्या सुटकेसाठी 70 देश करत होते प्रार्थना, कोण होता तो?

नेटफ्लिक्सवर आलेल्या IC-814 ‘द कंदहार हायजॅक’ वेब सीरीजमुळे पुन्हा एकदा 25 वर्षांपूर्वीची विमान अपहरणाची घटना चर्चेत आली आहे. या वेब सीरीजवरुन लोकांच ओपिनियन दोन गटांमध्ये विभागलेलं आहे. काहीजण या वेबी सीरीजच्या बाजूने आहेत, तर काहींच्या मते या वेब सीरीजमधील सर्वच गोष्टी तथ्यांवर आधारीत नाहीयत. या हायजॅकबद्दल वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण एक अशी गोष्ट आहे, जी फार कमी जणांना माहितीय. अपहरण झालेल्या IC-814 विमानात एक उद्योजक होता, त्याच्यासाठी स्विर्त्झलँडच्या सरकारने एक खास पथक कंदहारला पाठवलं होतं. हे सर्व गोपनीय पद्धतीने झालं होतं. भारताला सुद्धा याची कल्पना नव्हती. या विमानात असा कोण बिझनेसमन होता, त्याच्यासाठी हे सर्व करावं लागलं जाणून घ्या.

कंदहार हायजॅकच्यावेळी एक हाय-प्रोफाईल व्यक्ती त्या विमानात होता, त्याचं नाव आजपर्यंत सार्वजनिकरित्या समोर आलेलं नाही. त्या व्यक्तीच नाव आहे, रॉबर्टो जियोरी. तो, जगातील सर्वात मोठी नोटा छापणारी कंपनी डे ला रू चा मालक होता. त्यावेळी ही कंपनी जगातील 70 पेक्षा अधिक देशांसाठी नोटा छपाईच काम करायची. रॉबर्टो जियोरी क्रिस्टीना कॅलाब्रेसीसोबत काठमांडूला गेले होते. सुट्टया संपवून IC-814 विमानातून ते काठमांडूवरुन परतत होते.

या कंपनीचा मालक इतका महत्त्वाचा का होता?

रॉबर्टो जियोरी यांच्यामुळे प्रवाशांच्या सुटकेसाठी भारतावर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव वाढला होता. अनेक युरोपियन देशांनी भारतात फोन केले. रॉबर्टो जियोरी यांच्या सुरक्षेसाठी विनंती करण्यात आली. अनेक देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा हस्तक्षेप केला. त्यांची कंपनी डे ला रु केवळ नोट छपाईचच नाही, तर पासपोर्ट, स्टँम्प पेपर आणि सिक्योरिटीज सुद्धा प्रिंट करायची.

भारतीय नोटासुद्धा हीच कंपनी छापायची का?

रॉबर्टो जियोरी ब्रिटिश कंपनी डे ला रू चे मालक होते. ते स्विर्त्झलँडला रहायचे. या कंपनीच जगातील 90% करन्सी-प्रिंटिंगच्या व्यवसायावर नियंत्रण होतं. या कंपनीच प्रिंटिंग सेटअप ग्लोबल लेवलवर सर्वात मोठं होतं. अनेक आफ्रिकी आणि आशियाई देशांतील नोटांची छपाई ही कंपनी करायची. भारतही त्यावेळी या कंपनीकडून नोटा छापून घ्यायचा. 2016 नंतर हा कॉन्ट्रॅक्ट संपला. आता नोटांची छपाई भारतातच होते, ज्याची जबाबदारी सिक्योरिटी प्रिंटिंग एंड मिंटिंग कॉरर्पोरेशन ऑफ इंडिया टकसाळकडे आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर
या आठवड्यात प्रिया बापटने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. अलीकडेच तिची सिरिज ‘रात जवान है’ चा...
ना हिंदू ना मुस्लिम, सबा आझाद हिच्याकडून धर्माबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, माझे…
विठुरायाच्या टोकन दर्शनाचा मार्ग मोकळा; तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन रांगेची अद्यावत व्यवस्था
बदलापूर प्रकरणातील आरोपीचे कोणीही समर्थन केले नाही, स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न : नाना पटोले
योजनेच्या नावाखाली ग्रामस्थांचे फोटो घेतले, भाजपने आंदोलनाच्या बॅनरवर चिकटवले
Photo – गुलाबी रंगाच्या काश्मीरी सूटमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अंदाज
Mollywood Me Too – अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, अभिनेते सिद्धीकींविरोधात अरेस्ट वॉरंट जारी