SL Vs ENG Test – ओली पोपने ठोकले विक्रमी शतक, 147 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात असं करणारा ठरला पहिला फलंदाज

SL Vs ENG Test – ओली पोपने ठोकले विक्रमी शतक, 147 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात असं करणारा ठरला पहिला फलंदाज

इंग्लंडविरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडच्या युवा कर्णधार ओली पोपने शतक ठोकत इतिहास रचला आहे. Kennington Oval मध्ये सुरू असलेल्या या सामन्यात ओली पोपच्या बॅटमधून त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीतले सातवे शतक आले. या शतकासोबत त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Ollie Pope ने संयमी खेळी करत 102 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी केली. ओली पोपच्या शतकामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 3 गड्यांच्या मोबदल्यात 221 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसा अखेर ओली पोप (103 धावा) आणि हेरी ब्रुक (8 धावा) नाबाद खेळत आहेत. पहिल्या डावात ओली पोपने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीतील सातवे शतक ठोकले. विशेष म्हणजे त्याने 7 शतके 7 वेगवेगळ्या देशांविरूद्ध ठोकली आहेत.

क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे की, एखाद्या खेळाडूने 7 शतके 7 वेगवेगळ्या देशांविरूद्ध ठोकली आहेत. या सातव्या शतकासोबत ओली पोप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवेगळ्या देशांविरुद्ध सात शतके ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध सातवे शतक करण्यापूर्वी पहिली 6 शतके अनुक्रमे दक्षिण आफ्रिका, न्युझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, हिंदुस्थान आणि वेस्टइंडिज या देशांविरूद्ध शतकीय पारी खेळली आहे.

त्याचबरोबर ओली पोप हा इंग्लंडचा कर्णधार म्हणून वेगवान शतक ठोकणारा दुसरा युवा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार असताना ग्राहम गूच याने 1990 साली टीम इंडियाविरुद्ध 95 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय