भाजपकडून अटक होणार म्हणून एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले का? स्वत:च केला मोठा खुलासा

भाजपकडून अटक होणार म्हणून एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले का? स्वत:च केला मोठा खुलासा

टीव्ही९ मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडत रडत येत भाजपकडून आपल्याला अटक होणार असल्याची सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी रडणारा नाही लढणारा असून पोराठोरांचे काय प्रश्न विचारता असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मी रडणारा नाही लढणारा एकनाथ शिंदे आहे. मागचा पुढचा विचार केला नाही, सत्तेतून पायउतार होऊन बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सगळं सोडलं. त्यामुळे पोराठोरांचे काय प्रश्न विचारता. आयुष्यभर रडगाणं त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी आमच्यावर संस्कार केले आहेत. त्यामुळे कुठे थांबायचं, वैयक्तिक कोणाचं काय हे आम्ही सर्व पाहतो. याचा अर्थ कोणी वेगळा काढू नये, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं की, एक शब्दात तुमचा कार्यकाल लोकांनी का लक्षात ठेवावा हे एका वाक्यात सांगावं. यावर बोलताना, कॉमनमॅन आणि इन्फ्रामॅन, अॅक्सेसिबिलिटी, सिम्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी ही माझी ओळख असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

मागील अडीच वर्षाच्या काळात आम्ही अनेक प्रकल्प लोकार्पित केले त्याचा फायदा लोकं घेत आहेत. कोणतेही काम होणार नाही हा शब्द आमच्या डिक्श्नरीमध्ये नाही. तुमच्याकडे पॉझिटिव्ह व्हिजन असायला पाहिजे तरच आपण पुढे जावू शकतो, असं एकनाथ शिंदे यांनी  म्हटलं आहे.

मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्यावर बाहेर आल्याव उलट्या होतात असं विधान केलं होतं. यावर बोलताना, आमच्या मंत्री महोदयांनाही मी सांगितलं, आपण महायुतीमध्ये आहोत. महायुतीत बेबनाव होईल, असं कुठलंही वक्तव्य करता कामा नये. महायुतीत भांड्याला भांडं लागतं. कुटुंबातही कधीकधी मतभेद होतात छोट्या-मोठ्या कुरबुरी आहेत त्या मिटून जातील असं शिंदेंनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले
वरळी व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर टीका केली आहे. मराठी माणसांच्या हातातून मुंबई जातेय...
स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या- राज ठाकरे कडाडले
रजनीकांत यांनी केला थेट अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाले, त्यावेळी…
सामाजिक कार्यकर्त्या ते दिल्लीच्या मुख्यमंत्री, असा आहे आतिशी यांचा राजकीय प्रवास
Nagar News – नगर जिल्हा सहकारी बँक कोणत्याही क्षणी संपुष्टात येवू शकते, ॲड. प्रतापराव ढाकणे यांचा आरोप
भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री, अमित शहा यांची घोषणा
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखान्यांना 10 हजार कोटीचा फटका, शंकरराव गडाख यांचा आरोप