वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्रीने 20 वर्षीय तरुणासोबत थाटला संसार, नाही टिकलं लग्न, आता जगतेय असं आयुष्य
झगमगत्या विश्वात अशा अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या. बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री अशी आहे जिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्री लग्न 20 वर्षांच्या तरुणासोबत लग्न केलं. अभिनेत्रीने वयाच्या 32 व्या वर्षी 20 वर्षीय अभिनेत्यासोबत लग्न केलं. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अमृता सिंग आहे… सध्या सर्वत्र अमृता सिंग हिची चर्चा रंगली आहे.
अमृता सिंग हिने 1983 साली प्रदर्शित झालेल्या ‘बेताब’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. अमृता आणि अभिनेता सनी देओल दोघांनी देखील ‘बेताब’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. सनी देओल आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण अमृता मात्र झगमगत्या विश्वापासून दूर मुलांसोबत आयुष्य जगत आहे.
पहिल्याच सिनेमातून अमृताच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सनीसोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे खऱ्या आयुष्यात देखील सनी आणि अमृता यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा होण्याचा निर्णय घेतला.
सनी देओल याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीचं नाव दिग्गज आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. एवढंच नाही तर, भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यासोबत देखील अमृताच्या नावाची चर्चा रंगली. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत अमृताचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
वयाच्या 32 व्या वर्षी 20 वर्षांच्या सैफशी लग्न
सनी-विनोदशी संबंध तोडल्यानंतर आणि रवी शास्त्रीसोबत साखरपुडा मोडल्यानंतर, अमृता सिंग तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानच्या प्रेमात पडली. दोघांनीही 1991 मध्ये त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. त्यावेळी सैफने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणही केलं नव्हते.
लग्नाच्या वेळी सैफ फक्त 20 वर्षांचा होता आणि अमृता 32 वर्षांची होती. नंतर, दोघांनीही मुलगी सारा अली खान आणि नंतर मुलगा इब्राहिम अली खानचं जगात स्वागत केलं. पण 13 वर्षांनी सैफ आणि अमृता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
सैफने थाटला दुसरा संसार
घटस्फोटानंतर सैफ अली खान याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत दुसरा संसार थाटला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण अमृता हिने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. तिने सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला. आज वयाच्या 67 व्या वर्षी अमृता मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List