IPL 2025 – ईडन गार्डन्सवर सन्नाटा! शांत वातावरणात गुजरातने कोलकताला 39 धावांनी नमवलं, GT गुणतालिकेत अव्वल
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकताचा आवाज गुजरातने शांत केला. प्रथम फलंदाजी करताना आणि नंतर गोलंदाजी करताना गुजरातने दमदार खेळाचे प्रदर्शन करत 39 धावांनी सामना जिंकला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांचे आव्हान कोलकाताला दिले होते. साई सुदर्शन (52 धावा), शुभमन गिल (90 धावा) आणि जॉस बटलर (नाबाद 41 धावा) या तिघांनीच चौफेर फटकेबाजी करत 20 षटकांत 198 धावा चोपून काढल्या. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात गुरबाज 1 धाव करत माघारी परतला. त्यानंतर टप्याटप्याने विकेट पडत गेल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने 36 चेंडूंमध्ये 50 धावा करत एकाकी झुंज दिली. परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे संघाचा 39 धावांनी पराभव झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List