धक्कादायक! पैंजण चोरण्यासाठी आधी महिलेचा गळा चिरला मग दोन्ही पाय तोडले
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील जाहिरा गावात एका महिलेची तिच्या पायातील पैंजणांसाठी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी महिलेचे तोडलेले पाय पाण्याच्या टाकीत फेकून देत तिथून पळून गेले.
उर्मिला मीना असे त्या महिलेचे नाव असून त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाची अवस्था पाहून गावकरीही हादरले. उर्मिला या लाकूड तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या. मात्र उशीर झाला तरी त्या परतल्या नाहीत त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना उर्मिला यांचा मृतदेह शेतात सापडला. मृतदेह पाहून सर्वांना धक्काच बसला. उर्मिला यांचे दोन्ही पाय कापलेले होते व त्यांचा गळा चिरलेला. उर्मिला यांचे पाय तिथून काही अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकले होते व त्यांच्या पायात असलेले दोन किलो वजनाचे पैंजण गायब होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List