रेखा यांच्या बहिणीला पाहिलंत का? दिसते हुबेहूब रेखाच, होत्या प्रसिद्ध मॉडेल
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सदाबहार अभिनेत्री जिने आपल्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने सर्वांवर भूरळ घातली. ती नेहमीच तिच्या दमदार अभिनयासाठी आणि प्रत्येक लूकसाठी चर्चेत असते. ती अभिनेत्री म्हणजे अर्थातच रेखा. गेल्या अनेक दशकांपासून ग्लॅमर स्पॉटलाइटमध्ये रेखा असतातच. पण रेखा यांचे वैयक्तिक आयुष्यही तेवढेच चर्चेत राहिलं आहे. पण रेखाच्या कुटुंबाबद्दल आणि विशेषतः त्याची भावंडांबद्दल इतकी माहिती नाही. नाही त्यांनी कधी त्याबाबत चर्चा केली.
रेखा अन् राधा यांना पाहून सगळे गोंधळायचे
त्यांची लहान बहीण राधाबद्दल खूप कमी लोकांना माहिंती आहे. रेखाच्या कुटुंबात एकूण 6 बहिणी आणि 1 भाऊ आहे. त्यापैकी एक म्हणजे राधा. त्यांना मॉडेलिंगची आवड होती. रेखा यांच्या प्रमाणे त्यांच्या बहिणीला सुपरस्टारचा खिताब मिळाला आहे. राधा आणि रेखा या अगदी हुबेहूब दिसतात. तरूण असताना तर दोघी एकत्र आल्या की दोघींपैकी राधा कोण आणि रेखा कोण हे ओळखंणे कठीण जायचं. त्यांना पाहून लोकांनाही आश्चर्य वाटायचं.

राधा अभिनयासाठी नाही तर मॉडेलिंगसाठी प्रसिद्ध होत्या
रेखा यांचे वडील आणि अभिनेता जेमिनी गणेशन यांचे तीन लग्न झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना चार मुली, दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली आणि तिसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आणि एक मुलगा होता. याचा अर्थ रेखा यांना सहा बहिणी आणि एक भाऊ आहे. रेखा यांची बहीण राधा ही त्यांच्यापेक्षी लहान आहे. रेखाप्रमाणेच राधाही तिच्या बहिणीइतक्याच सुंदर आहेत. राधा मॉडेलमधून जास्त प्रसिद्ध होत्या. त्यांनी काही तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे, मात्र तया त्यांच्या फोटोशूटसाठी जास्त ओळखल्या जायच्या. कारण त्यांना अभिनयापेक्षा मॉडेलिंगमध्ये जास्त रस होता.
रेखा यांची बहीण आता काय करते अन् कुठे असते?
राधा यांना राज कपूर यांनी ‘बॉबी’ चित्रपटाची ऑफर दिली होती, ज्यामध्ये त्यांना ऋषी कपूर यांच्यासोबत काम करायचे होते. तथापि, त्यांनी हा चित्रपट नाकारला आणि नंतर हा चित्रपट डिंपल कपाडियाला ऑफर करण्यात आला. राधा यांच्या एका नकारामुळे डिंपल यांचे नशीब मात्र चमकले आणि त्या एका रात्रीत बॉलिवूड सुपरस्टार बनल्या. 1981 मध्ये, राधा यांनी त्यांचा बालपणीचा मित्र उस्मान सईदशी लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टी सोडली. सईद हा प्रसिद्ध दक्षिण भारतीय दिग्दर्शक एस.एम. म्हणजे अब्बास यांचा मुलगा. लग्नानंतर ते दोघं अमेरिकेत शिफ्ट झाले. त्यांना दोन मुलं असून त्यांचेही आता लग्न झाली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List