निवडणुकीतील गडबड,घोटाळा स्पष्ट दिसत आहे; राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र, हरयाणा निवडणुकीचा मुद्दा
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील बोस्टनमधील ब्राउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना संबधित करताना त्यांनी महाराष्ट्र, हरायाणा विधानसभा निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी निवडणुकीत निवडणूक आयोगाने तडजोड केल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येपक्षा जास्त मतदान झाले आहे. तसेच सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत 65 लाख मतदारांनी मतदान केल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षाच हे शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीत गडबड, घोटाळा झाल्याचे स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले.
एक मत देण्यासाठी सुमारे 3 मिनिटे लागतात. थोडे गणित केले तर याचा अर्थ असा की पहाटे 2 वाजेपर्यंत मतदान सुरू राहायला हवे. मात्र, असे झालेले नाही. आम्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग मागितल्यावर निवडणूक आय़ोगाने नकार दिला. त्यांनी नकार दिलाच आणि याबाबतचा कायदाही बदलला. त्यामुळे या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने तडजोड केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आपल्या निवडणूक प्रक्रियेत मोठी त्रुटी असल्याचेही ते म्हणाले.
मी अनेक वेळा सांगितले आहे की महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त प्रमाणाच मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने सायंकाळी 5.30 वाजता मतदानाचे आकडे जाहीर केले. त्यानंतर, संध्याकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान 65 लाख मते कशी पडली, असा सवालही त्यांनी केला. 2 तासांत 65 लाख मतदान होणे अशक्य आहे. मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे 3 मिनिटे लागतात. यावरून गणित केले तर मतदारांनी पहाटे २ वाजेपर्यंत रांगेत उभे राहायला हवे होते, पण तसे झाले नाही.
आम्ही निवडणुकीची व्हिडिओ फीडची मागिणी केली तेव्हा आयोगाने नकार दिला. इतकेच नाही तर त्यांनी कायदा बदलला जेणेकरून आम्ही व्हिडिओबद्दल पुढील प्रश्न विचारू शकणार नाही. राहुल यांनी मतदार यादीत फसवणूक झाल्याचा आरोप केला. भाजपने विजय मिळवण्यासाठी मतदार यादीत नवीन मतदार घुसवले. राहुल गांधी यांनी आरोप केला होता की लोकसभा निवडणुकीसाठी पाच वर्षांत महाराष्ट्रात 32 लाख मतदार जोडले गेले, तर पाच महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी 39 लाख मतदार जोडले गेले. याचे एक उदाहरण कामठी विधानसभा मतदारसंघ आहे, जिथे भाजपच्या विजयाचे अंतर नवीन मतदारांच्या संख्येइतकेच आहे.
आम्ही निवडणूक आयोगाला याची चौकशी करण्यास सांगितले. आम्ही मतदार यादी, नावे आणि पत्ते मागितले आहेत. आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी हवी आहे. अनेक मतदारांची नावेही वगळण्यात आली आहेत. ही दलित, अल्पसंख्याक मते आहेत. मी कोणतेही आरोप करत नाही. पण काहीतरी गडबड आहे, असे दिसून येते. ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या हरियाणा निवडणुकीच्या निकालांवरही काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काँग्रेसने ईव्हीएम छेडछाडीचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले होते की 20 जागांवर मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड आढळून आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List