दोन भाऊ एकत्र आल्यामुळे काही लोकांना शेतात किंवा संघदक्ष शाखेत जावं लागेल, संजय राऊत यांचा चिमटा
उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे काही लोकांना शेतात किंवा संघदक्ष शाखेत जावं लागेल अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे. आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव ठाकरे आणि राज एकत्र झाले तर आम्हाला काय आमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल. कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं, आजही करतो. आहोत पिढ्यान् पिढ्या पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काय कमी होत नाही. त्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल आणि त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो. महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्राने एकत्र येऊन हुकुमशाही विरुद्ध कायम लढे दिलेले आहे विसरू नका. चलेजाव आंदोलनाची ठिणगी या मुंबईतच पडली आणि त्यामध्ये मराठी गिरणी कामगार, मराठी माणूस पुढे होता हे लक्षात घ्या असे संजय राऊत म्हणाले.
आमच्या पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारच कोणी काहीच वक्तव्य केलेलं नाही. स्वतः उद्धव ठाकरे असतील, मी असेन किंवा आमचे इतर सहकारी प्रवक्ते असतील. तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं. या बाबतीमध्ये आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलेल आहे कोणी काही बोलू द्या कोणी किती खाजवत बसू द्या, मागून पुढून भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्मुला आहे. जेव्हा आम्ही ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं, एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं. मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे. पुढे जाताना याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकांवर टीका करत होतो. पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर आम्ही भूतकाळात पाहिलं नाही. आम्ही भविष्याचा विचार केला 2014 भारतीय जनता पक्षाने आमच्याशी युती तोडली हिंदुत्ववादी पक्ष असताना आम्ही युती तोडली, आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध प्रचंड टीका केली, परत आम्ही एकत्र आलो. तेव्हा आम्ही भूतकाळात पाहिलं नाही, आम्हाला एकत्र यायचं होतं. अशा वेळी उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं. राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी जेव्हा आम्ही हात मिळवणी करतो, तेव्हा कशा करता मागे कशाला खाजवत बसायचं. पुढे बघा ना, आम्ही त्या विचाराचे आहोत. माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत भूतकाळाचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचं आहे. आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे हे ठरलंय. हे दोन नेत्यांमद्ये ठरले आहे. मग उद्धवजींनी खाली संदेश दिलेला आहे. आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही, चार भिंतीआड आपण बोलू शकतो. पण ज्याच्यामुळे हा नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि होणार नाही असेही संजय राऊत म्हणाले.
कोणी कशा करता का बोलावं? स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावर त्यामध्ये इतरांनी बोट घालण्याची गरज नाही. जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत. नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती, हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार? जेव्हा आमच्या माननीय पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय मी सगळे मतभेद भांडण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायला तयार आहोत, तर संदेश स्पष्ट आहे. आमच्या शिवसैनिकांना आणि आमच्या पक्षातल्या सगळ्या हितचिंतकांना सांगायची गरजच नाही. पक्षप्रमुखाचा संदेश खाली गेलेला आहे असे संजय राऊत म्हणाले. यामुळे मिंधे गटाची गाळण उडाली आहे. हे जे कोणी बोलतायत ना त्यांचा त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही. त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रेम नाही. यांची सत्ता उलथून टाकली जाईल त्या भीतीतूनही बोलत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी केलेल्या एक्सवरील पोस्टवर म्हणाले की, कुणाच्या बुडाला कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धोधो बाहेर पडते धूर कसा बाहेर पडतो आहे. माननीय उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांनी फक्त संकेत दिलेत तर एवढी आग लागते. नंतर तर स्वतःला जाळून घेतील लोक.
ए सं शी
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात साद प्रतिसाद सुरू झाल्यावर! pic.twitter.com/AfQdJs6sUJ— Sanjay Raut (@rautsanjay61) April 21, 2025
त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेचा संपूर्ण कारभार हिंदीतून करावा आणि चीन प्रमाणे किंवा जपान प्रमाणे स्वतःच्या भाषेवर जग चालवावं. त्यांनी थोडी हिंम्मत दाखवावी. देशाच्या संसदेच हिंदीकरण करावं, पूर्णपणे देशाच्या संसदेमध्ये 70 टक्के लोक इंग्रजीमध्ये बोलतायत, त्यांना हिंदीमध्ये बोलायला सांगा काही हरकत नाही. हा एक प्रयोग एका सत्रामध्ये करून बघा आणि मग तुम्हाला कळेल की देवेंद्र फडवणीस हे एक वेगळा अजेंडा राबवू इच्छित आहेत. तो अजेंडा देशात चालणार नाही आणि यांच्या प्रत्येक अजेंड्या मागे निवडणुकीचं राजकारण असतं. स्वच्छ आणि निर्मळ असं काही नाही. महाराष्ट्रामध्ये वारंवार सांगितले की इथल्या लोकांना हिंदी भषा येते. हिंदीची जरी ही जन्मस्थान नसलं तरी हिंदीचे अनेक घडामोडी चित्रपट, साहित्य, संस्कृती, कला, उद्योग याचे स्थान आहे. ज्या भारतीय सिनेसृष्टीचा हिंदी सिनेसृष्टीचा उगम इथून होतोय त्या भागाला हिंदी शिकवण्याची गरज नाही. हिंदी सिनेसृष्टीचा सगळ्यात मोठा महसूल हा या महाराष्ट्रातून होतोय. म्हणजे आम्ही हिंदी पाहतोय, हिंदी ऐकतोय तुम्ही आमच्यावर कशाला हिंदी लादताय? इतर राज्यांमध्ये हिंदी लादा असेही संजय राऊत म्हणाले.
तसेच अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आलेलेच आहेत. आम्ही आतापर्यंत एसंशि असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलत का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही. आम्ही नाही भेटणार. एकत्र यायला आमच्याकडे काय वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही, आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही, आमच्याकडे काहीच नाहीये. त्याच्यामुळे ते त्यांच्या स्वागताचे अजित दादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघत होतो. ते त्यांचा प्रश्न आहे तो. आमचं प्रेम आहे तितकाच टोकाचा आणि कडवटपणा तितकाच असतो आणि त्यात भेसळ नसते असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List