गाडेगाव कोळसा खाण होणार; 8 गावातील जमीनींचे अधिग्रहण करणार, सेक्शन 9 ची अधिसूचना जारी
वेकोलीच्या वणी क्षेत्रातील सर्वात मोठी खुली कोळसा खाण असलेल्या पैनगंगा कोळसा खाणींचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. कोळशाची वाढती मागणी लक्षात घेता पैनगंगा खुल्या कोळसा खाणीची दुसरी कोळसा खाण गाडेगाव खाण या नावाने सुरू होत असून यासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या सेक्शन 9 ची अधिसूचना वेकोलीकडून जाहीर करण्यात आली आहे.
या कोळसा खाणीसाठी गाडेगावसह 8 गावातील जमिनीचे कोळसा खाणीसाठी अधिग्रहण करण्यात येणार आहे. वेकोलीच्या वणी क्षेत्रातील सर्वात मोठी उत्पादन देणारी कोळसा खाण म्हणून पैनगंगा खुल्या कोळसा खाणीचे नाव घेतले जाते.या कोळसा विरूर गावाजवळ कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे आढळून आल्याने वेकोलिने काही वर्षांपूर्वी विरूर गावाचे पुनर्वसन केले. त्यांनतर टप्याटप्याने वेकोली प्रशासनाने परिसरातील जमिनींचे अधिग्रहण केले. मात्र कोळशाची वाढती मागणी लक्षात घेता आता पैनगंगा खुल्या कोळसा खाणींचे विस्तारीकरण करण्यात आले असून पैनगंगा खुल्या कोळसा खाणीची दुसरी कोळसा खान गाडेगाव या नवीन नावाने सुरू करण्यात येणार आहे. या खाणीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहण सेक्शन 9 ची अधिसूचना वेकोली प्रशासनाने 15 एप्रिलला जारी केली आहे. या गाडेगाव खुल्या कोळसा खाणीसाठी विरूर, सोनुर्ली, गाडेगाव, कविठगाव, खैरगाव, हिरापूर, सांगोडा, कारवाई गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List