राज्यात हिंदीला दुसऱ्या भाषेचा पर्याय, फडणवीसांची माघार
राज्यात हिंदी भाषेला इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा आम्ही देऊ. नवीन शैक्षणिक धोरणाने तशी मुभा दिलीच आहे. मराठी भाषेवर अतिक्रमण होणार नाही. राज्यात फक्त मराठीची सक्ती राहणार असल्याचे सांगत या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता, फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यास राज्यातील मराठी भाषा तज्ञांनी आणि एकूण सामाजिक संस्था व भाषेच्या अभ्यासकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्यातील मराठी भाषेवर हिंदीचे आक्रमण होत असल्याचा मुद्दा तज्ञांनी मांडला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List