‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी मासिक पाळीबद्दल स्वतःचं मत मांडलं आहे. आता अभिनेत्री जान्हवी कपूर हिने देखील मासिक पाळीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी जान्हवीने अशा पुरुषांवर निशाणा साधला आहे, जे माहिलांच्या मासिक पाळीकडे तिरस्काराने दुर्लक्ष करतात. पुरुषांमध्ये मासिक पाळीत होणारा त्रास सहन करण्याची शक्ती नाही… जान्हवीने नुकताच दिलेल्या मुलाखतीत मासिक पाळीच्या महिलांना होणाऱ्या वेदना आणि तिरस्काराने पुरुष देत वागणुकीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
जान्हवी म्हणाली, ‘मासिक पाळी दरम्यान महिलांच्या वागणुकीत बदल होतात. त्यांच्या बोलण्याची पद्धत देखील बदलते. मासिक पाळी दरम्यान महिला भांडणं करत असतील तर, ते दिवस महिलांसाठी फार वेदनादायी असतात. त्यामुळे त्या दिवसांमध्ये पुरुषांनी विचार करुन बोलायला हवं. कारण त्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना फार तिव्र असतात.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘काही पुरुष मासिक पाळीकडे तिरस्काराने दुर्लक्ष करतात. मी ठामपणे सांगू शकते की, पुरुष मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना आणि मूड स्विंग एक मिनिटासाठी देखील सहन करु शकणार नाहीत. जर पुरुषांना मासिक पाळी आली असती तर कोणत्या प्रकारचे अणुयुद्ध झालं असतं कोणास ठाऊक? जान्हवीच्या या कमेंटला सोशल मीडियावर महिलांचा पाठिंबा मिळाला आहे.’ सध्या सर्वत्र जान्हवी कपूरच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
सांगायचं झालं तर, याआधी देखील जान्हवीने मासिक पाळीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. मासिक पाळी सुरु असताना मी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करते… असं अभिनेत्री म्हणाली होती. ‘मासिक पाळी सुरु असताना मी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करते. सुरुवातीला माझ्या स्वभावामुळे ती व्यक्ती देखील हैराण व्हायची. पण आता माझ्या बॉयफ्रेंडला देखील सर्व गोष्टी कळल्या आहेत. त्यामुळे तो मला समजून घेतो…’
जान्हवीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय जान्हवी ‘परम सुंदरी’ सिनेमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर अभिनेत्री तेलुगू सिनेमा ‘पेद्दी’ सिनेमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List