बीकेसी बरोबरच ठाणे, मीरा- भाईंदरमध्येही पॉड टॅक्सीचा प्रयोग

बीकेसी बरोबरच ठाणे, मीरा- भाईंदरमध्येही पॉड टॅक्सीचा प्रयोग

मुख्य मेट्रो आणि रिंग रुट मेट्रो यांना परस्पर कनेक्टिव्हीटी निर्माण करण्यासाठी तसेच टॅक्सी आणि ऑटो रिक्षांच्या अवाच्या सवा भाड्या आकारणीतून सुटका देण्यासाठी बीकेसी ते कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसरात एमएमआरडीए लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या धर्तीवर पॉड ट्रॅक्सीचा प्रयोग राबविणार आहे. या मीरा-भाईंदर येथेही पॉड ट्रॅक्सीची संकल्पना राबविण्याचा संकल्प परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. आज महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित मंत्र्यांसमोर या पॉड टॅक्सी प्रकल्पाचे सादरी करण करण्यात आले.

मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रो यांना योग्य कनेक्टिव्हीटी तयाक व्हावी आणि रस्त्यावरील रहदारी कमी करण्यासाठी वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी आता बीकेसी बरोबरच ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्येही पॉड टॅक्सी संकल्पना राबविणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पॉड टॅक्सी संदर्भात आज मंत्री सरनाईक यांच्या समोर सादरीकरण करण्यात आले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या कामांचा आढावा आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. यावेळी पॉड टॅक्सीचे सादरीकरण करण्यात आले. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे. तिथपर्यंत पोहचण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. रोप वे प्रमाणे ही टॅक्सी चालवली जाणार असून पावसाळ्यात या भागात रस्त्यावर पाणी साचून होणाऱ्या वाहतुक कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे.

१६ प्रवाशांची क्षमता

पॉड टॅक्सीचा वेग ताशी ६० ते ७० किमी एवढा असणार आहे. यातून एकावेळेस उभे आणि बसून १६ प्रवासी जाऊ शकतात. ज्या प्रवाशांना ज्या स्थानकापर्यंत जायचे असेल त्याठिकाणीच ही टॅक्सी थांबणार आहे. संपूर्णपणे इलेक्ट्रीकवर ही टॅक्सी धावणार आहे. यासाठी सिमेंटचे गर्डर असणार असून याचे व्हिल आणि ट्रॅक हे स्टीलचे असणार असल्याची माहिती यावेळी संबधींत कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली. घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते विहंग हील या एक किमीच्या ४० मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही टॅक्सी धावणार आहे. प्रायोगीक तत्वावर ही हवाई वाहतुक सुरु होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

पॉड टॅक्सीचा फायदा हा  मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. याशिवाय मीरा- भाईंदर महापालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जीपी येथील ६० मीटर रस्त्यावर पॉड ट्रॅक्सी चालविली जाणार आहे. तसेच एमएमआर क्षेत्रातही आता सर्व्हे केला जाणार असून ज्याठिकाणी रोप वे शक्य असेल त्याठिकाणी रोपवे आणि ज्या ठिकाणी पॉड टॅक्सी शक्य असेल त्याठिकाणी ही सेवा देण्याला प्राधान्य दिले. या संदर्भातील निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील झाला असून त्यानुसार आता सर्व्हे करुन पुढील निर्णय घेतला जात असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Obesity Control: लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतोय? ‘या’ ट्रिक्स करतील वजन कमी….. Obesity Control: लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतोय? ‘या’ ट्रिक्स करतील वजन कमी…..
गेल्या काही वर्षांत अगदी कमी वयाच्या मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसतेय. लठ्ठपणा वाढल्यामुळे एक अहवाल खूप प्रसिद्ध झाला आहे. जागतिक...
Sweet Craving Control: तुम्हाला सुद्धा जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय आहे का? नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो….
मांसाहारीच नाहीतर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही प्रथिनांचा भरघोस साठा, आहारात करा समावेश
Champions Trophy 2025 – पराभव जिव्हारी लागला, ‘या’ खेळाडूने कर्णधारपदाचा दिला राजीनामा
बॅलेट पेपरच निवडणुकीसाठीचं सर्वात सुरक्षित माध्यम; EVM वरून ट्रम्प यांचं पुन्हा मोठं विधान, मोदींवर साधला अप्रत्यक्ष निशाणा
पद्मश्री नामदेव ढसाळ यांची अवहेलना करणाऱ्या सेन्सर बोर्ड अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करा, युवा पँथर संघटनेची मागणी
बीकेसी बरोबरच ठाणे, मीरा- भाईंदरमध्येही पॉड टॅक्सीचा प्रयोग