माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही…खुर्चीत बसून संपवेन… रामराजे निंबाळकर यांचा कुणाला इशारा?

माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही…खुर्चीत बसून संपवेन… रामराजे निंबाळकर यांचा कुणाला इशारा?

माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण मी १९९१ ला फलटणमध्ये केलं होतं. तेव्हा पासुनच आम्हाला २५ ते ३० वर्ष चाललेले चुकीचं राजकारण पटत नव्हतं. त्याकाळी विकास आणि सामान्य माणूस नव्हे तर सत्ताच केंद्रबिंदू होती. या सगळ्या चाललेल्या चुकीच्या बाबी थांबवण्यासाठी आम्ही राजकारणात पडलो. आम्ही राजकारणात आल्यावर फलटणसाठी विकास केला. पाणी आणलं… मी अजूनही थकलेलो नाही. मात्र क्रिकेट‌ खेळताना तरूणपणात पायाला लागलेलं होतं. त्यामुळं पायाचं दुखणं आता सुरु आहे. माझं वय ७७ आहे. त्यामुळे ते दुखणं त्रास देणारच.. पण माझं डोकं चालतंय त्याला काय करायचं? डोकं चालतंय तोपर्यन्त तुम्ही काळजी करु नका, खुर्चीत बसून संपवीन असा दमच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री  रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना  दिला आहे. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही काम केलं आहे. हा विश्वास घालवू नका एवढंच मी सांगतो असेही  रामराजे यावेळी म्हणाले.

रामराजे पुढे म्हणाले की, आतापर्यंत जे केलं आहे, ते सांभाळायची कुवत कोणत्या कार्यकर्त्यांमध्ये आणि तालुक्याच्या नेतृत्वामध्ये आहे, हे आम्हाला जरा सांगा. आम्ही राजकीय भांडणं सोडवतो. आम्हाला कोणाबद्दल बोलायचं नाही. पण, हे सगळं गणित जे गेलं आहे. उरमोडी झालं नसतं तर माणला पाणी कुठून मिळालं असतं. जिहे काठापूरला अर्धा टीएमसी पाणी मी दिलं. पाणी म्हटलं की राजकारण आलंच. मला आता त्यात पडायचं नाही. आपण आपला तालुका सांभाळायचा असा इशारा देखील रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

जनतेने आमच्यावर गेली ३० वर्षांपासून जो विश्वास टाकला आहे. तो विश्वास मात्र तेवढा घालवू नका, एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. राज्यात आपण मतं मिळवायला कमी पडलो आहोत, पण कामांमध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही. त्या कामाची मते मिळविण्यात आम्ही कमी पडलेलो आहोत. राज्यातील दोन मोठे पक्ष आपल्या विरोधात होते, असेही रामराजे निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sindhudurg News – आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरकमहोत्सवानिमित्त नाटके व एकांकिकांची मेजवानी Sindhudurg News – आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरकमहोत्सवानिमित्त नाटके व एकांकिकांची मेजवानी
आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई यांचा यावर्षी हिरक महोत्सव साजरा होत असून यानिमित्त मंडळातर्फे निर्मित दोन नाटके सादर होणार असून दि.28...
हिंदुस्थानचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, जम्मू कश्मीरमध्ये चाहत्यांनी फोडले फटाके
शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत
छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक, आता ठरवली अशी रणनीती
झोपण्यापूर्वी हे पाणी प्या… चमत्कारीक फायदे ऐकून तुम्हीही तोंडात बोट घालाल; वस्तू छोटी पण…