प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर

प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधून ४० लाखांची रोकड चोरी करणाऱ्याला जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली आहे. त्याने ही चोरी करण्यामागचे कारणही समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रीतम चक्रवर्ती यांचा स्टुडिओ युनिमस रेकॉर्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव-मालाड लिंक रोड येथील रुस्तमजी ओजोन बिल्डिंगमध्ये आहे. या स्टुडिओमध्ये ४ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता चोरी झाली. या स्टुडिओमध्ये काम करणारा एक व्यक्ती दुपारी आला. त्याने निर्माता मधु मनटेनाचं नाव सांगत कामाच्या बहाण्याने ४० लाखांची बॅग घेतली आणि तो फरार झाला. आशिष सायाल असे चोरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव होतं. याप्रकरणी प्रीतम यांच्या मॅनेजरने मुंबईतील मालाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात होता. अखेर आज या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या संगीतकार आणि गायक प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओमध्ये ४० लाख रुपये असलेली ट्रॉली बॅग ठेवण्यात आली होती. आरोपीने ट्रॉली बॅगसह ही रक्कम चोरली आणि संधी मिळताच पळून गेला. या प्रकरणात मालाड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

जम्मू -काश्मीरकडून अटक

अटक केलेल्या आरोपीचे नाव आशिष बोटिराम सय्यल असे असून तो 32 वर्षांचा आहे. त्याला जम्मू -काश्मीरकडून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 37 लाख, एक लॅपटॉप आणि एक मोबाईल जप्त केला आहे. या आरोपीला गाणे आणि थेट संगीत बनवायचे होते. त्याला संधी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात ऑपरेशन टायगर, काँग्रेसच्या बड्या नेत्याची पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना नेत्यासोबत भेट राज्यात ऑपरेशन टायगर, काँग्रेसच्या बड्या नेत्याची पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना नेत्यासोबत भेट
Ravindra Dhangekar: राज्यात शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत अनेक नेते अन् पदाधिकारी शिवसेनेत सहभागी होत आहे....
चित्रपट रिलीज होताच थेट 18 देशांमध्ये बॅन; पहिल्यांदा चित्रपट पाहिला अन् प्रेक्षकांची डोकी सुन्न झाली
वडिलांच्या विरोधात उचललं टोकाचं पाऊल, सिनेमासाठी लिंग बदल, आज कोट्यवधींची मालकीण आहे ‘ही’ अभिनेत्री
हेल्मेट घालून मुंबईच्या रस्त्यांवर बॉलीवूड सेलिब्रिटी कपलची स्कूटरवारी; ओळखणंही कठीण
कन्नडिगांनी काळं फासलेल्या एसटी चालकाचा शिवसेनेकडून सत्कार
शिवराज सिंह चौहान यांना एअर इंडियात आला वाईट अनुभव, टाटा व्यवस्थापनाला फटकारले
Champions Trophy 2025 – बोंबला..! ऑस्ट्रेलिया-इंग्लंड लढतीआधी लाहोरच्या गद्दाफी मैदानावर वाजलं हिंदुस्थानचं राष्ट्रगीत