पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं

पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं

पालघर जिल्ह्यातल्या वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत एका कार चालकानं दारूच्या नशेत भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं आहे. वसईच्या फादरवाडी सिग्नलवर आज 4 वाजता ही घटना घडली आहे, या अपघातामध्ये एक महिला जखमी झाली आहे, तर इतर वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार  कारचालक हा वसईमध्ये असलेल्या विद्याविकासनी शाळेचा मुख्याध्यापक असल्याचं  स्थानिक नागरिकांनी सांगितले असून, मारिया दासो असे दारूच्या नशेत अपघात करणाऱ्या या मुख्यध्यापकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टोयोटा कंपनीची कार हा मुख्याध्यापक चालवत होता, त्याने भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं. त्याच्या गाडीमध्ये बियरच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत.

वसईच्या फादरवाडी सिग्नलवर या कार चालकाने प्रथम एका रिक्षाचालकाला उडविले, त्यानंतर एका वडापावच्या हातगाडीला उडविले, त्याठिकाणी वडापाव खात असलेल्या महिलेच्या अंगावर गरम तेल पडल्याने ती या घटनेत जखमी झाली आहे. हा कारचालक एवढ्यावरच थांबला नाही तर  त्यानंतर त्याने एकामागून एक आणखी काही वाहनांना धडक दिली.

त्यानंतर  घटनास्थळावरील अन्य काही  वाहनचालकांनी याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वेळीच येऊन या मुख्यध्यापकाला ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. त्याची गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. मुख्याध्यापक असूनही हा व्यक्ती दारूच्या नशेत गाडी चालवत होता. यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत होत आहे. पोलिसांनी याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

जालन्यात बसचा अपघात 

दरम्यान दुसरीकडे जालन्यात देखील बसच ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड बसस्थानकात ही घटना घडली आहे, बस फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली? 500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली?
अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल...
सिनेमा मराठीत का बनवला नाही? स्क्रिप्ट चांगली नाही; ‘छावा’ सिनेमावर मराठमोळ्या अभिनेत्रीची टीका
‘छावा’ सिनेमाला यश, विकी कौशल पोहोचला 300 वर्ष जुन्या शिव मंदिरात, असं केल्यानं पूर्ण होतात सर्व मनोकामना
‘तो बॅटिंग करत नव्हता तरीही…’, धनश्रीने उघड केलं युजवेंद्र चहलचं ते सीक्रेट
नगर अर्बनच्या घोटाळ्यातील आरोपी अजूनही मोकाट कसे? मुख्यमंत्र्यांनी कडक पावले उचलली पाहिजेत
अहिल्यानगरमध्ये अतिक्रमण हटाव सुरूच राहणार! दोन हजारांचा दंड करणार
वाईतील दोघांनीच दिली मुंबईतील चोरट्यांना टीप,सराफ बाजारातील चोरीचे गुढ उकलले; चौघांना अटक